india 4th largest economy भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली; जपानला मागे टाकत ऐतिहासिक भरारी

india 4th largest economy

india 4th largest economy – IMF च्या अहवालानुसार, भारताने जपानला मागे टाकत जागतिक अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक भरारी घेतली आहे. 4.19 ट्रिलियन डॉलरच्या GDP सह भारताने ही कामगिरी सातव्यांदा सिद्ध केली आहे.

नवी दिल्ली : india 4th largest economy भारताने जागतिक अर्थकारणात एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) एप्रिल 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालानुसार, भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवलं आहे. भारताची एकूण नाममात्र सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2025 मध्ये 4.19 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली असून, ही आकडेवारी IMF ने अधिकृतपणे जाहीर केली आहे.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी रविवारी 25 मे 2025 रोजी 10 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीदरम्यान ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. “ही माझी आकडेवारी नाही, IMF चा अधिकृत डेटा आहे. आज भारत जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

सुब्रमण्यम यांच्यानुसार, भारत आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी यांच्याच मागे असून, योग्य धोरणे व विकासाच्या दिशेने पावले टाकली गेल्यास पुढील 2.5 ते 3 वर्षांत भारत जर्मनीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो.

जगातील टॉप १० अर्थव्यवस्था (IMF २०२५ नुसार, वर्तमान किमतीत जीडीपी – US$ मध्ये):

2025 मधील टॉप 10 देशांचे GDP (ट्रिलियन डॉलरमध्ये)
रँकदेशGDP (ट्रिलियन डॉलर)
1अमेरिका$30.51
2चीन$19.23
3जर्मनी$4.74
4भारत$4.19
5जपान$4.19
6युनायटेड किंगडम$3.84
7फ्रान्स$3.21
8इटली$2.42
9कॅनडा$2.23
10ब्राझील$2.13

IMF च्या नव्या अहवालानुसार, भारताचे नावमात्र GDP 2025-26 मध्ये $4.287 ट्रिलियन पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचवेळी जपानचे GDP $4.186 ट्रिलियन असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे भारताचा क्रमांक अधिकृतपणे वर सरकलेला आहे.

हे पण वाचा.. msrtc चा सुरक्षा आराखडा : बसस्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही आणि कमांड सेंटरच्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता प्रथम

अनंत शक्यता आणि नव्या दिशा

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यावर प्रतिक्रिया देताना ट्विटर (X) वर लिहिले की, “ही कोणतीही साधी कामगिरी नाही, हे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे.” त्यांनी भारताला पुढील उद्दिष्ट ‘प्रति व्यक्ती उत्पन्न वाढवणे’ असे ठरवण्याचा सल्ला दिला. त्यांच्यामते, आर्थिक विकासासोबत सामाजिक व वैयक्तिक प्रगतीही महत्वाची आहे.


सध्याचा भारताचा प्रति व्यक्ती उत्पन्न (per capita income) 2025 मध्ये $2,880 पर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे, जे 2013-14 मध्ये $1,438 होते. एका दशकात दुपटीने झालेली ही वाढ देशातील आर्थिक आणि धोरणात्मक परिवर्तनांचे प्रतिक आहे.

हे पण वाचा ..टेलिकॉम क्षेत्रात मोठा निर्णय? सायबर फसवणुकीविरोधात ‘Airtel’, ‘Jio’ आणि ‘Vi’ एकत्र येण्याची शक्यता

स्थैर्य, वाढ आणि आव्हानं

IMF ने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 2025-26 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.2 टक्के राहील, जो जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरच्या अनेक देशांच्या तुलनेत अधिक स्थिर आणि वेगवान आहे. तरीही, व्यापार तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे हे प्रमाण मागील अंदाज 6.5 टक्क्यांपेक्षा किंचित कमी आहे.

नीती आयोगाच्या ‘विकसित भारत @2047’ या दृष्टिकोन अहवालातही भारताची ही भरारी अधोरेखित करण्यात आली आहे. त्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, भारत जो कधीकाळी ‘फ्रॅजाइल फाइव्ह’ देशांमध्ये गणला जात होता, तो आता अवघ्या एका दशकात ‘टॉप फाइव्ह’ अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवतोय.

पुढील लक्ष्य – तिसरे स्थान आणि ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी नीती आयोगाने सहा महत्त्वाच्या ‘बिल्डिंग ब्लॉक्स’ ओळखले आहेत – आर्थिक धोरण, सक्षम नागरीक, शाश्वत व फुलणारी अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान नेतृत्व, जागतिक नेतृत्व, आणि शासन-सुरक्षा-न्याय या घटकांवर आधारित अंमलबजावणीची रूपरेषा आखली आहे.

या सर्व घटकांची सांगड घालत 2046 पर्यंत भारत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि उच्च उत्पन्न गटातला देश बनेल, असा विश्वास या दृष्टिकोन पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

india 4th largest economy भारताची चौथ्या क्रमांकाची ही भरारी केवळ आकड्यांची कामगिरी नसून, देशातील जनतेच्या मेहनती, धोरणात्मक निर्णय, आणि विविध क्षेत्रातील यशस्वी योगदानांचे फलित आहे. आता पुढील वाटचाल केवळ आकड्यांपर्यंत सीमित न राहता, समान विकास, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही समांतर प्रगती घडवून आणणं, हे खऱ्या अर्थाने ‘विकसित भारत’ होण्यासाठी गरजेचं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *