hyundai creta ही भारतात सर्वाधिक पसंतीस उतरलेली SUV आहे. मात्र तिच्या किंमतीत क्वचितच सवलत मिळते. पण जर तुम्ही अशा SUV च्या शोधात असाल जिच्यात क्रेटासारखी स्टाईल, फीचर्स आणि जबरदस्त सेफ्टी आहे, तीही लाखोंच्या सवलतीसह, तर ही बातमी नक्की वाचा!
Table of Contents
भारतीय SUV बाजारात ह्युंदाई क्रेटा (hyundai creta) हे नाव एक ट्रेंड बनलं आहे. मजबूत रचनेपासून ते अत्याधुनिक फीचर्सपर्यंत, क्रेटाने आपल्या वर्गात वर्चस्व निर्माण केलं आहे. मात्र, याच लोकप्रियतेमुळे क्रेटा बहुतेक वेळा कोणत्याही सवलतीशिवाय विकली जाते. आणि म्हणूनच, ज्यांना “ह्युंदाई क्रेटा” हवी आहे पण बजेटमुळे थांबावं लागतंय, त्यांच्यासाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.
जर्मन कार निर्माता Volkswagen सध्या भारतात आपल्या दोन प्रमुख मॉडेल्सवर – Taigun SUV आणि Virtus सेडानवर मोठ्या सवलती देत आहे. या सवलती “hyundai creta” ला टक्कर देणाऱ्या Taigun SUV वर सर्वाधिक आहेत.
Volkswagen Taigun वर प्रचंड सवलती
ह्युंदाई क्रेटाचा मोठा प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या Volkswagen Taigun SUV वर जून 2025 मध्ये तब्बल रु. 2.70 लाखांपर्यंतची सवलत दिली जात आहे. विशेषतः GT Plus Chrome ट्रिमवर ही सवलत लागू आहे. इतर व्हेरिएंट्सवर देखील रु. 2.20 लाखांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.
Taigun च्या किंमती (ऑन रोड मुंबई) सध्या रु. 14.10 लाख ते रु. 23.63 लाखांच्या दरम्यान आहेत. पण या ऑफर अंतर्गत, बेस व्हेरिएंट म्हणजे Comfortline 1.0L TSI MT केवळ रु. 10.99 लाखांमध्ये मिळू शकतो. यासोबतच जुन्या कार एक्सचेंज करणाऱ्यांना रु. 20,000 चा स्क्रॅपेज बोनस देखील मिळतो.
ही ऑफर बघता, “hyundai creta” चा विचार करणाऱ्यांसाठी Taigun ही एक दमदार आणि किफायतशीर पर्याय ठरू शकते.
Volkswagen Virtus सेडानवरही मोठी ऑफर
सिर्फ SUV नव्हे, तर सेडान प्रेमींनाही Volkswagen ने खूश केलं आहे. Virtus या स्टायलिश आणि प्रीमियम सेडानवर देखील रु. 2.20 लाखांपर्यंतच्या सवलती मिळत आहेत. विशेषतः Topline 1.0L TSI MT व्हेरिएंटवर ही सर्वाधिक ऑफर आहे.
Virtus GT Plus Chrome 1.5L TSI DSG वर रु. 1.55 लाखांपर्यंत सवलत, तर Highline 1.0L TSI AT वर रु. 2.15 लाखांपर्यंत फायदा मिळतो. यासोबत प्रत्येक व्हेरिएंटवर स्क्रॅपेज बोनस रु. 20,000 अतिरिक्त आहे.
Virtus च्या किंमती सध्या रु. 13.68 लाख ते रु. 22.95 लाखांच्या दरम्यान आहेत. ऑफर अंतर्गत किंमत मात्र 10.54 लाखांपासून सुरू होते.
Volkswagen कडून ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
जून 2028 मध्ये Volkswagen कडून जाहीर झालेल्या या सवलतीमुळे ग्राहकांना एक उत्तम डील मिळत आहे. ही ऑफर केवळ काही निवडक व्हेरिएंट्ससाठीच आहे आणि ती शहरानुसार किंवा डीलरशिपनुसार थोडीफार वेगळी असू शकते. पण एक गोष्ट नक्की – जे ग्राहक hyundai creta सारखी SUV विकत घेण्याच्या विचारात आहेत पण किंमतीमुळे मागे हटत आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
Volkswagen च्या Taigun आणि Virtus या दोन्ही मॉडेल्सना असलेले आधुनिक फीचर्स, सुरक्षा स्टँडर्ड्स आणि स्टायलिश लुक्स यामुळे त्या क्रेटाच्या जवळपास जातातच, काही बाबतीत अधिक चांगल्याही आहेत. आणि आता जर त्यावर लाखोंच्या सवलती मिळत असतील, तर hyundai creta पासून नजर हटवण्याची वेळ आली आहे!
हे पण वाचा ..sitaare zameen par’मधील जोडी चर्चेत 60 वर्षांचा आमिर, 23 वर्षांनी लहान जिनिलियासोबत प्रेमाच्या भूमिकेत..!
“hyundai creta” ची क्रेझ आजही कमी झालेली नाही. पण तिच्या तोडीस तोड पर्याय म्हणून Volkswagen Taigun हे नाव नक्कीच पुढे येतंय. खास करून जेव्हा त्यावर रु. २.७० लाखांची सवलत मिळते तेव्हा ही SUV अधिकच आकर्षक वाटते. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर “hyundai creta” च्या जागी Taigun किंवा Virtus वर एक नजर टाकायला हरकत नाही. पण घाई करा, कारण ही ऑफर फक्त जून २०२५ पर्यंतच मर्यादित आहे.