hruta durgule aarpaar chahata propose autograph tattoo marathi cinema news : मराठी सिनेसृष्टीत आपल्या मोहक स्मितहास्याने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी Hruta Durgule पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिच्या नव्या चित्रपटामुळे नव्हे, तर एका जबरदस्त फॅनच्या अनोख्या कृतीमुळे.
‘फुलपाखरू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली Hruta Durgule आता ‘आरपार’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान हृताला भेटलेल्या एका चाहत्याने तिला सगळ्यांसमोरच प्रपोज केलं. त्याने अभिनेत्रीला ऑटोग्राफ देण्याची विनंती केली आणि त्या ऑटोग्राफचा कायमस्वरूपी टॅटू आपल्या हातावर कोरून घेण्याचं ठरवलं.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओत तो फॅन म्हणताना दिसतो, “मॅम, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. आतापर्यंत तुमचे १० प्रोजेक्ट्स झाले – ३ मालिका, २ वेब सिरीज आणि ५ चित्रपट. तुम्ही नुकतीच तुमच्या ११व्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. माझ्या शरीरावर आधीच १० टॅटू आहेत आणि मला तुमचा ऑटोग्राफ ११वा टॅटू म्हणून कोरायचा आहे. तुमचा ११वा प्रोजेक्ट आणि माझा ११वा टॅटू… मॅम, माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे.”
या क्षणाला उपस्थित असलेल्या सर्वांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला आणि हृताही या अनोख्या फॅनच्या प्रेमळ कृतीने भारावून गेली. अभिनेत्रीने त्याला ऑटोग्राफ दिला आणि तो ऑटोग्राफ खरोखरच त्याच्या हातावर टॅटू करून घेतला.
हे पण वाचा.. “लग्नाआधीच सरप्राइज? भूषण प्रधानच्या पोस्टने चाहत्यांना टाकलं संभ्रमात!”
दरम्यान, हृताचा ‘आरपार’ हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ललित प्रभाकरसोबत तिची अनोखी लव्हस्टोरी पडद्यावर पाहायला मिळत आहे.
हृता दुर्गुळे हिला महाराष्ट्राची “क्रश” म्हणून चाहत्यांनी दिलेलं टायटल पुन्हा एकदा या प्रसंगामुळे खऱ्या अर्थाने सिद्ध झालं आहे. तिच्या अभिनयाइतकंच प्रेक्षकांचं तिच्यावरचं प्रेमही आजवर कायम चर्चेत राहिलं आहे.
हे पण वाचा.. साऊथ इंडियन असूनही मराठी मनाचा – ‘दशावतार’मुळे चर्चेत आलेला सिद्धार्थ मेनन









