ADVERTISEMENT

hindustan unilever चा मार्च तिमाही आणि आर्थिक वर्ष 2025 चा आर्थिक अहवाल जाहीर, CEO रोहित जावा यांचा सकारात्मक अंदाज

60,000 कोटींचा टप्पा पार; hindustan unilever ची विक्री आणि नफ्यात वाढ, रोहित जावा यांचे भविष्यासाठी आशादायी भाकीत
hindustan unilever

60,000 कोटींचा टप्पा पार; hindustan unilever ची विक्री आणि नफ्यात वाढ, रोहित जावा यांचे भविष्यासाठी आशादायी भाकीत

फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) क्षेत्रातील आघाडीची कंपनी hindustan unilever लिमिटेड (HUL) ने आर्थिक वर्ष 2024-25 आणि मार्च 2025 तिमाहीचा आर्थिक अहवाल जाहीर केला आहे. कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षात 60,680 कोटी रुपयांचा टर्नओव्हर नोंदवला असून, मागील वर्षाच्या तुलनेत 2% वाढ झाली आहे. या काळात कंपनीचा निव्वळ नफा (PAT) 10,644 कोटी रुपये इतका झाला असून, त्यात 5% वाढ झाली आहे. याचबरोबर कंपनीने 24 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश जाहीर केला असून, एकूण वर्षभरातील लाभांश 12,453 कोटी रुपयांवर पोहोचला आहे

hindustan unilever मार्च तिमाहीतील कामगिरी – स्थिर वाटचाल

मार्च 2025 तिमाहीत कंपनीने 3% चा अंडरलाईंग सेल्स ग्रोथ (USG) आणि 2% चा अंडरलाईंग व्हॉल्युम ग्रोथ (UVG) नोंदवला. या काळात EBITDA मार्जिन 23.1% वर आला, जो मागील वर्षीच्या तुलनेत 30 बेसिस पॉइंट्सने घसरलेला आहे. मात्र निव्वळ नफा आणि अपवादात्मक बाबींव्यतिरिक्तचा नफा, दोन्हीही 4% ने वाढले.

सेगमेंटनुसार कामगिरी

होम केअर विभाग:

या विभागाने 3% विक्री वाढ दाखवली असून, यामध्ये मध्य-एकेरी आकड्यात व्हॉल्युम ग्रोथ झाला. प्रीमियम फॅब्रिक वॉश आणि कंडीशनरमुळे फॅब्रिक वॉश विभागाने मजबूत वाढ नोंदवली. हाउसहोल्ड केअरमध्ये उच्च-एकेरी आकड्यात वाढ झाली. लिक्विड फॉरमॅट्समध्येही डबल डिजिट ग्रोथ दिसून आली. याच तिमाहीत Surf Excel Smart Shots चे नवे फॉर्म्युलेशन बाजारात आणण्यात आले.

ब्युटी आणि वेलबीईंग:

या विभागात 3% वाढ झाली असून, हेअर केअरने व्हॉल्युमच्या जोरावर डबल डिजिट ग्रोथ नोंदवली. मात्र स्किन केअर आणि कलर कॉस्मेटिक्समध्ये किरकोळ घट झाली. डिजिटल चॅनेल्स आणि हायड्रेशन मार्केटमध्ये कंपनीने इनोव्हेशनच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली. Lakme आणि Vaseline अंतर्गत सन केअर प्रॉडक्ट्स तसेच Liquid IV सारखे नवे प्रॉडक्ट्स लाँच करण्यात आले.

पर्सनल केअर:

या विभागात 3% वाढ झाली असली, तरी व्हॉल्युम थोडा घसरला आहे. स्किन क्लेन्सिंग विभागात महागाईमुळे किंमत वाढवावी लागली. नॉन-हायजिन सेगमेंटमध्ये उच्च-एकेरी आकड्याने वाढ झाली. बॉडी वॉशने आपले नेतृत्व अधिक मजबूत केले. Oral Care विभागात Close-up च्या White Now टूथपेस्टची नवीन रेंज बाजारात आली.

फूड्स:

फूड्स विभागाचा टर्नओव्हर 1% ने घटला. टी आणि कॉफी विभागाने अनुक्रमे कमी आणि डबल डिजिट वाढ दर्शवली. मात्र न्यूट्रिशन ड्रिंक्समध्ये मागणी घटल्याने गटातील कामगिरी थोडीशी दबावात राहिली. तसेच किचन प्रॉडक्ट्स, आंतरराष्ट्रीय पाककृती आणि आइसक्रीम सेगमेंटने चांगली वाढ दर्शवली. Kwality Walls Twister, Magnum Pistachio यांसारखे प्रॉडक्ट्स नव्याने लाँच करण्यात आले.

हे पण वाचा..‘adani ports’चा जगभरातील विस्तार, ऑस्ट्रेलियन टर्मिनल 2.6 अब्ज डॉलर्सच्या व्यवहारात खरेदी

CEO रोहित जावा यांचा विश्वास – पुढील तिमाहीत अधिक चांगली कामगिरी अपेक्षित

कंपनीचे CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर रोहित जावा यांनी सांगितले की, “विक्रीत आणि नफ्यात वाढ झाल्याने आमची बाजारातील आघाडीची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. आमच्या पोर्टफोलिओमध्ये बदल, इनोव्हेशनमध्ये वाढ, नव्या ब्रँड्सचे लाँच आणि डिजिटल चॅनेल्समधील गुंतवणूक यामुळे कंपनीची वाटचाल आशादायक ठरली आहे. Pureit च्या विक्रीनंतर आणि Minimalist च्या अधिग्रहणामुळे आम्ही आमचा पोर्टफोलिओ पुन्हा संकलित केला आहे. तसेच Ice Cream व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय घेतला आहे.”

जावा यांनी पुढे सांगितले की, “सध्या कोणतेही नवीन अडथळे दिसत नाहीत. शेतीचा चांगला परिपाक, सामान्य मान्सूनची शक्यता, आणि अन्नधान्य महागाईमध्ये घट यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढेल. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या करसवलतींचाही परिणाम शहरी आणि ग्रामीण ग्राहकांवर सकारात्मक राहील.”

भविष्यातील रणनीती – पोर्टफोलिओ ट्रान्सफॉर्मेशन आणि नव्या क्षेत्रांत विस्तार

hindustan unilever सध्या आपल्या उत्पादनांमध्ये नावीन्य आणि विविधता यांच्यावर भर देत आहे. यामध्ये Unilever च्या स्थिर ब्रँड्समधून स्वतंत्र ब्रँड तयार करणे, Bolt-on स्वरूपातील अधिग्रहणे आणि नव्या विभागात पाय रोवणे यांचा समावेश आहे. रोहित जावा यांच्या म्हणण्यानुसार, hindustan unilever चा 80% व्यवसाय ब्रँड ओळखीच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी करतो.

शेअर बाजारात पडझड

मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2,493 कोटी रुपये होता, जो मागील वर्षी याच तिमाहीच्या तुलनेत 3.7% ने जास्त आहे. महसूलही 2.4% ने वाढून 15,214 कोटी रुपयांवर पोहोचला. मात्र शेअर बाजारात कंपनीचा शेअर 4.1% नी घसरून NSE वर 2,324 रुपयांवर बंद झाला आणि तो Nifty 50 मधील सर्वात मोठा तोट्यातील शेअर ठरला.

नजर भविष्यात – FY26 च्या पहिल्या सहामाहीत चांगली कामगिरी अपेक्षित

कंपनीला विश्वास आहे की, आगामी जून आणि सप्टेंबर तिमाहीत मागील काही तिमाहींपेक्षा चांगली कामगिरी होईल. स्थिर कमोडिटी दर, सुधारलेले ग्रामीण उत्पन्न, आणि ग्राहक मागणीतील वाढ यामुळे HUL ची वाढ पुन्हा वेग घेईल.

हे पण वाचा..waaree energies चे शेअर्स 8% नी वधारले; आज तिमाही निकाल जाहीर होणार