hemalata bane extortion case archana patkar clarification : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने सापळा रचत दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारत असतानाच हेमलता बाणे आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस या दोघींना रंगेहाथ पकडलं. या घटनेनंतर मराठी मनोरंजन विश्वातही चर्चांना उधाण आलं, कारण हेमलता बाणे हिचं नाव अभिनेत्री Archana Patkar यांच्याशी जोडलं जात होतं.
हेमलता बाणे ही मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. काही काळापासून ती ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं बोललं जात होतं. सोशल मीडियावर दोघांचे फोटोही व्हायरल झाले. मात्र, या सर्व चर्चांनंतर Archana Patkar यांनी स्वतः पुढे येत सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर केली आणि या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं ठामपणे सांगितलं.
Archana Patkar यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, त्यांचा मुलगा आणि हेमलता बाणे यांचा चार वर्षांपूर्वीच विभक्त होण्याचा निर्णय झाला आहे. सध्या त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्या यावर अधिक भाष्य करणार नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. गेली चार दशके प्रामाणिकपणे काम करत असताना, या प्रकरणामुळे आपलं नाव आणि फोटो गैरवापरासाठी वापरले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मीडियाने आणि प्रेक्षकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात नोव्हेंबर महिन्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून झाली. साखरपुड्याच्या कार्यक्रमात लेझर लाईटच्या वापरावरून बांधकाम व्यावसायिकाच्या मुलासोबत या दोघींचा वाद झाला. त्यानंतर खोटे आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, जी नंतर साडेपाच कोटींवर आली.
व्यावसायिकाने अखेर गुन्हे शाखेकडे धाव घेतली आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लोअर परळ परिसरात सापळा रचला. २३ डिसेंबर रोजी दीड कोटी रुपये स्वीकारताना या दोघींना अटक करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं की, आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही सखोल तपास केला जाणार आहे.
हे पण वाचा.. अमेय नारकरसोबत डेटवर अभिनेत्री ईशा संजय, रोमँटिक फोटो व्हायरल
या संपूर्ण प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या Archana Patkar यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांना पाठिंबा देत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या पोलीस तपास सुरू असून, पुढील चौकशीतून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या दिग्दर्शकाने घेतली नवी गाडी









