ADVERTISEMENT

वहिनीच्या अंत्यसंस्कारानंतर थेट शूटला गेलो…हार्दिक जोशी याने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ

hardik joshi sister in law death emotional journey :
hardik joshi sister in law death emotional journey

hardik joshi sister in law death emotional journey : मराठी टेलिव्हिजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता Hardik Joshi हा आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा ही भूमिका त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेमुळे त्याला केवळ लोकप्रियता मिळाली नाही, तर त्याचं वैयक्तिक आयुष्यही नव्या वळणावर आलं. याच मालिकेनंतर Hardik Joshi आणि अक्षया देवधर यांनी २०२२ मध्ये लग्न केलं. मात्र, लग्नानंतर लवकरच त्याच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद वळण आलं.

नोव्हेंबर २०२३ मध्ये हार्दिकच्या मोठ्या वहिनीचं निधन झालं. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. Hardik Joshi याने एका मुलाखतीत सांगितलं की, वहिनी ही केवळ घरातील सदस्य नव्हती, तर त्याच्या आयुष्यातील मजबूत आधारस्तंभ होती. अभिनय क्षेत्रात सुरुवातीला संघर्ष करत असताना वहिनीने त्याला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत असताना रोजचा प्रवास कसा करायचा, यासाठीसुद्धा तिने स्वतःचा त्याग केला होता. “तुला नोकरी करायची नसेल तर करू नकोस, तू अभिनयावरच लक्ष दे,” असं ठामपणे सांगणारी व्यक्ती म्हणजे वहिनीच होती, असं हार्दिक भावूक होत सांगतो.

या कठीण काळात Hardik Joshi याची पत्नी अक्षया त्याच्यासाठी खंबीर आधार बनून उभी राहिली. घरात सगळं विस्कळीत असताना अक्षयाने स्वतःचं करिअर थांबवण्याचा निर्णय घेतला. तिला अनेक मालिका आणि प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स असूनही, तिने घराकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं मानलं. “मी सगळं सांभाळते,” हे शब्द अक्षयाने स्वतःहून सांगितले, असं हार्दिकने सांगताना तिच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या काळात Hardik Joshi एका नव्या मालिकेसाठी सज्ज होत होता. प्रोमो शूट होऊन तो ऑनएअर झाला आणि त्याच दिवशी डॉक्टरांनी वहिनीबद्दल गंभीर इशारा दिला. त्या क्षणी हार्दिकने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑक्सिजनवर असतानाही वहिनीने त्याला शो न सोडण्याची शपथ घातली. दुर्दैवाने, मालिकेचा पहिला भाग प्रसारित होण्याआधीच वहिनीचं निधन झालं. विशेष म्हणजे, तो दिवस वहिनीचा वाढदिवस होता. याला हार्दिक आजही तिचा आशीर्वाद मानतो.

हे पण वाचा.. लाखात एक आमचा दादा’नंतर नितीश चव्हाण पुन्हा चर्चेत; भक्तीमय गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला

“वहिनीचे अंत्यसंस्कार करून मी थेट पहिल्या एपिसोडच्या शूटला गेलो,” असं सांगताना Hardik Joshi याच्या आवाजात दुःख स्पष्ट जाणवत होतं. कलाकाराचं आयुष्य किती कठीण असतं, हे या अनुभवातून पुन्हा एकदा वाटअधोरेखित झालं. दुःख असो वा आनंद, ‘शो मस्ट गो ऑन’ हीच कलाकाराची खरी परीक्षा असते, हे हार्दिकच्या शब्दांतून स्पष्ट होतं.

हे पण वाचा.. माझ्या वडिलांसाठी हा क्षण खास…प्रियदर्शिनी इंदलकरला पुणे विद्यापीठाचा युवागौरव पुरस्कार

hardik joshi sister in law death emotional journey