hardeek joshi luxury car diwali surprise : लोकप्रिय मराठी अभिनेता Hardeek Joshi याने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाच्या भूमिकेमुळे घराघरात ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
हार्दिकने नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली असून त्याचा खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या “फॅमिली मेंबर”चं स्वागत करताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या पोस्टनंतर त्याच्या फॅन्समध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
हार्दिकने खरेदी केलेली गाडी म्हणजे Mahindra Scorpio N. ही गाडी सध्या बाजारात खूप लोकप्रिय असून तिची किंमत १३.२० लाख ते २४.१७ लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. व्हेरिएंट आणि शहरानुसार किंमतीत थोडाफार फरक असू शकतो. गाडी घेताना हार्दिकसोबत त्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. त्याने ही खास झलक व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणली.
पोस्ट शेअर करताना हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिलं, “दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर आमच्या कुटुंबात या गाडीचं आगमन झालं आहे. #NewFamilyMember.” चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला — “कडक अभिनंदन दादा”, “राणादा भारीच”, “एकदा ठरवलं की काम झालं” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत.
हार्दिक जोशी आणि त्याची पत्नी अक्षया देवधर हे दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ‘राणादा’ आणि ‘पाठकबाई’ म्हणून प्रसिद्ध झालेली ही जोडी २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं.
व्यावसायिक आयुष्यातही हार्दिक जोशी सातत्याने नवनवीन प्रकल्पांमध्ये झळकत आहे. नुकताच तो ‘अरण्य’ या चित्रपटात झळकला होता. तर अक्षया देवधर सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावना ही भूमिका साकारत आहे.
हे पण वाचा.. ‘पारू’ फेम शरयू सोनावणेला स्टेशनवर आलेला भयावह अनुभव; म्हणाली, “मी सहनच केलं नाही!”
दिवाळीच्या या खास प्रसंगी हार्दिक जोशीच्या गाडीनं केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही, तर मराठी मनोरंजनविश्वालाही आनंद दिला आहे.
हे पण वाचा..७ महिन्यांनंतर ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेने दाखवला लेकीचा चेहरा Tharala Tar Mag Monika Dabade Baby









