ADVERTISEMENT

‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कृष्णा-दुष्यंतच्या लग्नानंतर रंगणार जागरण गोंधळ; समृद्धी केळकरने चाहत्यांना दिलं खास आमंत्रण!

halad rusli kunku hasla samruddhi kelkar jagaran gondhal : 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत लग्नसोहळ्यानंतर कृष्णा-दुष्यंतच्या जागरण गोंधळाचा धमाल कार्यक्रम रंगणार आहे. अभिनेत्री समृद्धी केळकरने सेटवरील हा खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आमंत्रण दिलं आहे.
halad rusli kunku hasla samruddhi kelkar jagaran gondhal

halad rusli kunku hasla samruddhi kelkar jagaran gondhal : ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘हळद रुसली कुंकू हसलं’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत कृष्णा आणि दुष्यंत या प्रमुख पात्रांचा विवाह सोहळा रंगला आणि त्यातली प्रत्येक झलक चाहत्यांच्या मनाला भावली. आता या लग्नानंतर मालिकेत पारंपरिक रंगत आणणारा “जागरण गोंधळ” कार्यक्रम रंगणार असून त्याचा झलकदार व्हिडीओ अभिनेत्री समृद्धी केळकरने नुकताच चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

समृद्धी केळकर नेहमीच मालिकेच्या सेटवरील आनंददायी क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात संपूर्ण कलाकार मंडळी पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. कृष्णा-दुष्यंतच्या लग्नानंतर पार पडणाऱ्या या “जागरण गोंधळा”च्या सीनमध्ये वातावरण अगदी उत्सवी रंगात न्हालेलं दिसतं. व्हिडिओ शेअर करताना समृद्धीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मंडळी, कृष्णा-दुष्यंतच्या लग्नाचा जागरण गोंधळ हाय! अवतान धाडलंय, नक्की यायचं!”

या खास प्रसंगासाठी मालिकेच्या सेटवरही सुंदर पारंपरिक सजावट करण्यात आली आहे. प्रकाशमाळा, फुलांची आरास आणि पारंपरिक संगीत यांच्या तालावर कलाकार मंडळी नाचताना आणि मजा करताना दिसत आहेत. कृष्णा आणि दुष्यंतच्या भूमिकेतले समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या केमिस्ट्रीने या सीनला अधिक रंगत आणली आहे.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका जरी नुकतीच सुरू झाली असली तरी अल्पावधीतच प्रेक्षकांनी ती डोळसपणे स्वीकारली आहे. या मालिकेतील कथानक, पात्रांची मांडणी आणि त्यातील भावनिक तसेच पारंपरिक घटक प्रेक्षकांना जोडून ठेवतात. विशेष म्हणजे, समृद्धी आणि अभिषेक हे दोघे पहिल्यांदाच एकत्र झळकत असून त्यांच्या स्क्रीनवरील केमिस्ट्रीची विशेष चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

समृद्धी केळकर यापूर्वी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत दिसली होती, तर अभिषेक रहाळकर ‘मन धागा धागा जोडते नवा’ मधून प्रेक्षकांना परिचित आहे. त्यामुळे या दोघांच्या नव्या जोडगोळीने ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

हे पण वाचा.. सविता प्रभुणे म्हणाल्या – “इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, ते पाहून Savita Prabhune Gharo Ghari Matichya Chuli

आज म्हणजेच ४ ऑक्टोबरच्या भागात हा जागरण गोंधळाचा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पारंपरिक वातावरण, धमाल-मस्ती आणि कलाकारांचा उत्साह यामुळे हा एपिसोड प्रेक्षकांसाठी एक खास पर्व ठरणार आहे.

समृद्धी केळकरच्या या व्हिडिओमुळे मालिकेची चर्चा पुन्हा रंगात आली असून चाहत्यांना या एपिसोडची आतुरता लागली आहे. तिच्या उत्साही पोस्टने मालिकेच्या प्रमोशनला नवचैतन्य दिलं आहे, हे मात्र निश्चित!

हे पण वाचा.. हर्षदा खानविलकर यांनी मेघन जाधवच्या कामाचं कौतुक केलं; ऑनस्क्रीन जावयाबद्दल खुलासे

halad rusli kunku hasla samruddhi kelkar jagaran gondhal