google gemini student offer : विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! Google कडून मोफत AI Pro सबस्क्रिप्शन, २TB Cloud Storage सह

google gemini student offer

google gemini student offer : भारतीय विद्यार्थ्यांना Google कडून मोठी भेट; मोफत AI Pro प्लॅन, Gemini 2.5 Pro सह अभ्यास, होमवर्क, प्रोजेक्टसाठी वापर करता येणार. विद्यार्थ्यांसाठी २ TB क्लाउड स्टोरेजसह Google Workspace मध्ये थेट AI सुविधा.

विद्यार्थ्यांसाठी Google ची मोठी ऑफर, Gemini AI Pro मोफत; अभ्यास, होमवर्क आणि करिअरसाठी मिळणार स्मार्ट साथीदार

शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या जगात मोठा बदल घडवणाऱ्या google gemini student offer मुळे आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी AI वापरणं आणखी सुलभ होणार आहे. गुगलने अलीकडेच घोषणा केली आहे की भारतातील १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांना मोफत Google AI Pro सबस्क्रिप्शन दिलं जाणार असून, यात Gemini 2.5 Pro सारख्या प्रगत AI टूल्सचा समावेश असणार आहे. ही सुविधा १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

Google कडून करण्यात आलेल्या या घोषणेनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. Google-Kantar च्या अलीकडील अहवालानुसार, ७५% भारतीयांना AI चा रोजच्या अभ्यासासाठी, करिअरसाठी मदतीचा हात म्हणून उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या AI चा वापर करणाऱ्या ९५% भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वास मिळाल्याचं या अभ्यासात दिसून आलं आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार काय?

या विशेष ऑफर अंतर्गत विद्यार्थ्यांना Gemini 2.5 Pro चा वापर करता येणार आहे. या AI मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास, होमवर्क, परीक्षा तयारी, लेखन यामध्ये अनलिमिटेड मदत मिळणार आहे. याशिवाय, Deep Research सारखी advanced AI सुविधा वापरता येईल, ज्यामुळे संशोधन, प्रोजेक्ट रिपोर्ट, नोट्स तयार करणं अधिक सोपं होईल.

हे पण वाचा..youtube videos :15 जुलैपासून YouTube चे मोठे पॉलिसी बदल; कॉपी-पेस्ट किंवा रिपिटेटिव्ह व्हिडीओ टाकणाऱ्यांची कमाई थांबणार

AI थेट Google Apps मध्ये

या AI Pro प्लॅनमुळे Google Workspace मधील Gmail, Docs, Sheets, Slides यांसारख्या अ‍ॅप्समध्येही AI ची थेट मदत मिळणार आहे. म्हणजेच नोट्स लिहिणं, मेल्स तयार करणं, डेटा मॅनेज करणे हे सर्व काम AI सहज करून देणार आहे.

याशिवाय, NotebookLM मध्ये ५ पट अधिक डेटा मॅनेजमेंटची सुविधा, Gemini Live द्वारे थेट संवाद साधण्याची आणि Veo 3 च्या सहाय्याने फोटोंमधून किंवा मजकूरातून डायनॅमिक व्हिडीओ तयार करण्याची सुविधा यात मिळणार आहे.

२TB क्लाउड स्टोरेज फ्री

या प्लॅनमध्ये Google Drive, Gmail आणि Photos साठी एकूण २ TB क्लाउड स्टोरेज मोफत दिलं जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट, रिसर्च, फाईल्स, फोटो सुरक्षित ठेवणं अधिक सोपं होईल.

ही संधी कशी मिळणार?

विद्यार्थ्यांनी या सुविधेसाठी Google च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली पात्रता शाळा, कॉलेज ID, फी पावती किंवा timetable च्या सहाय्याने verify करावी लागेल. यासाठी गुगलच्या SheerID प्रणालीचा वापर करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिगत Gmail अकाउंट वापरून ही नोंदणी पूर्ण करायची आहे. नोंदणीनंतर लगेचच सबस्क्रिप्शन अ‍ॅक्टिव्ह होणार आहे आणि १२ महिन्यांसाठी कोणताही शुल्क लागू होणार नाही.

जर नोंदणी त्याच वेळी पूर्ण केली नाही, तरी Google कडून मेलद्वारे पुन्हा लिंक पाठवली जाईल. नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे.

हे पण वाचा ..google photos अ‍ॅपमध्ये मोठे बदल; QR शेअरिंग आणि अल्बम डिझाईनमध्ये नवता

किंमत किती वाचणार?

ही सुविधा सामान्यत: १९,५०० रुपयांच्या दराने विकली जाते, मात्र विद्यार्थ्यांसाठी हे एक वर्ष पूर्णपणे मोफत आहे. शिक्षण आणि करिअरमध्ये AI चा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी गुगलने हा उपक्रम राबवला आहे.

विद्यार्थ्यांच्या वापरासाठी कशी मदत होणार?

Google चे म्हणणं आहे की, भारतात विद्यार्थी या AI चा वापर अभ्यास, इंटरव्ह्यू तयारी, नवीन कल्पना सुचवण्यासाठी, अभ्यास नोट्स तयार करण्यासाठी, आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत. AI द्वारे तयार केलेले पॉडकास्ट, सराव प्रश्नपत्रिका, स्टडी गाईड्स यामुळे अभ्यास अधिक उपयुक्त होतोय.

google gemini student offer का खास?

AI च्या या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान नव्हे तर त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होईल. शैक्षणिक, संशोधनात्मक, आणि करिअर उभारणीसाठी हे पॅकेज परिपूर्ण आहे. यामध्ये Google ची सर्वात प्रगत टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरासाठी सहज उपलब्ध होणार आहे.

भारतासारख्या प्रचंड मोठ्या विद्यार्थ्यांच्या देशात अशा प्रकारच्या ऑफर्समुळे शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारेल यात शंका नाही. Google कडून Gemini AI Pro Student Offer हा तंत्रज्ञानाचा आणि शिक्षणाचा सुवर्णसंधी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *