ADVERTISEMENT

गिरीजा ओक आणि शरीब हाश्मीचं मराठी गाणं सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद

girija oak sharib hashmi marathi song video : गिरिजा ओक आणि शरीब हाश्मी यांनी मिळून गायलेल्या जुन्या मराठी गाण्याच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांनी दोघांचं कौतुक करत प्रेमाने भरलेले कमेंट्स केले आहेत.
girija oak sharib hashmi marathi song video

girija oak sharib hashmi marathi song video : जुन्या मराठी गाण्यांची जादू आजही तितकीच ताजी आणि मनाला भिडणारी आहे. ९० च्या दशकातली अनेक गाणी आजच्या पिढीलाही तितकीच आवडतात. अशाच गाण्यांपैकी ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ हे लोकप्रिय गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, तेही एका खास कारणामुळे. मराठीची ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी Girija Oak आणि ‘फॅमिली मॅन’ मालिकेत जेकेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता शरीब हाश्मी यांनी मिळून हे गाणं गायले असून त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

गिरीजा ओक ही मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत गेली अनेक वर्ष आपलं वेगळं स्थान टिकवून आहे. अभिनयाइतकाच तिचा गायकीकडील कलाही प्रेक्षकांनी ‘सिंगिंग स्टार’ सारख्या कार्यक्रमातून अनुभवला आहे. ती अधूनमधून सोशल मीडियावर आपल्या गोड आवाजाचे व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी तिनं शरीब हाश्मीबरोबर मिळून हे जुनं सुरेख गाणं गायलं आहे.

शरीबनं हा व्हिडिओ शेअर करताना, “तळपदे मीट्स मिसेस इन्झेंडे ऑन Tunes Day! थॅंक्यू Girija Oak, आमची नॅशनल क्रश,” अशा कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. गिरीजाच्या आवाजातील माधुर्य आणि शरीबच्या सहजसुंदर प्रस्तुतीमुळे या व्हिडिओला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळू लागला.

व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर कलाकार आणि चाहत्यांची कमेंट्सची बरसात झाली. आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, अभिजीत सावंत, पुष्कर श्रोत्री, अमृता सुभाष यांसारख्या अनेक कलाकारांनी दोघांचं कौतुक करत व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, या गाण्याची नव्याने सादर केलेली आवृत्ती मन प्रसन्न करणारी आहे.

यापूर्वीही शरीब हाश्मीनं ‘लाजून हासणे’ या गाण्यावरचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आता गिरीजा ओकसोबतच्या या गाण्यानं त्याचं कौतुक आणखी वाढवलं आहे. जुन्या गाण्यांना आधुनिक सादरीकरणाची ही जोड नेटकऱ्यांना अगदी भावली आहे.

हे पण वाचा.. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट…स्मिता पाटील यांच्याशी होणाऱ्या तुलनेवर रिंकू राजगुरूचे मनमोकळं वक्तव्य

Girija Oak आणि शरीब हाश्मी यांचा हा नवीन संगीताचा प्रयोग खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना आनंद देणारा ठरला असून पुढे ते दोघे आणखी कोणती गाणी सादर करतात, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.

हे पण वाचा.. २१ वर्षांची साजिरी जोशी टीव्हीवर करणार धमाकेदार पदार्पण; लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकीचा नवा प्रवास सुरू

girija oak sharib hashmi marathi song video