girija oak shah rukh khan jawan set experience : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Girija Oak हिने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान खऱ्या आयुष्यात कसा आहे, याचा खास अनुभव सांगितला आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या गाजलेल्या चित्रपटात गिरिजा ओकला शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या काही घटना आजही तिच्या मनात ठळकपणे कोरल्या गेल्या असल्याचं तिने स्पष्ट केलं.
एका मुलाखतीत बोलताना Girija Oak म्हणाली की, शाहरुख खान हा फक्त मोठा अभिनेता नाही, तर तो अत्यंत संवेदनशील आणि माणुसकी जपणारा व्यक्ती आहे. चेन्नईमध्ये ‘जवान’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना एका प्रसंगात त्याच्याकडून डायलॉग बोलताना चूक झाली. त्यामुळे पूर्ण सीन पुन्हा घ्यावा लागणार होता. सेटवर आधीच उशीर झाला होता आणि वातावरण खूपच थंड होतं. अशा परिस्थितीतही शाहरुखने सेटवरील प्रत्येक व्यक्तीकडे पाहून मनापासून माफी मागितली. “माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा एक टेक करावा लागतोय, I am really sorry,” असं तो सतत म्हणत होता, असं गिरिजा ओकने सांगितलं.
त्या सीनदरम्यान शाहरुखला विग लावून शूट करावं लागत होतं. त्यामुळे तापमान कमी ठेवणं गरजेचं होतं, अन्यथा त्याला प्रचंड घाम यायचा. मात्र, या थंड वातावरणाचा त्रास इतर कलाकारांना होत होता. शॉट सुरू होताच सगळे जॅकेट काढून अभिनयासाठी तयार व्हायचे. अशा स्थितीत चूक झाल्यानंतर एखादा मोठा स्टार सहज दुर्लक्ष करू शकतो, पण शाहरुखने तसं केलं नाही. Girija Oak च्या मते, त्याच्या वागण्यातून तो प्रत्येक सहकलाकाराचा आदर करतो, हे स्पष्टपणे जाणवत होतं.
याशिवाय तिने आणखी एक प्रसंग शेअर केला. ‘जवान’चे दिग्दर्शक अॅटलीचा वाढदिवस असताना संपूर्ण टीम चेन्नईत होती. अॅटलीचं सेलिब्रेशन लोकेशन खूप लांब होतं. रात्री उशिरा Girija Oak आणि इतर महिला कलाकार प्रोडक्शनच्या गाडीने हॉटेलकडे निघाल्या. त्यावेळी शाहरुखने स्वतःहून त्यांना विचारलं की, तुम्ही सुरक्षितपणे कशा जाणार आहात? त्यानंतर त्याने आपल्या सुरक्षा ताफ्यातील एक गाडी त्यांच्या गाडीमागे पाठवली. त्या गाड्या हॉटेलपर्यंतच नाही, तर हॉटेलच्या लिफ्टपर्यंत थांबल्या. सगळ्या सुरक्षित आत गेल्यावरच शाहरुखचे गार्ड्स तिथून निघाले.
हे पण वाचा.. मालिका संपताच अभिनेत्री आजारी! शूटिंगचा शेवटचा दिवस साजरा करून घरी जाताच सानिका बनारसवाले ला सलाईन
Girija Oak च्या मते, अशा लहानसहान गोष्टींमधून शाहरुख खानची माणुसकी आणि जबाबदारी दिसून येते. म्हणूनच तो फक्त मोठा अभिनेता नाही, तर मोठं व्यक्तिमत्त्व असल्याचं ती ठामपणे सांगते.
हे पण वाचा.. Suraj Chavan च्या आलिशान बंगल्याचं नाव ठरलं भावनिक; नेमप्लेटचा पहिला फोटो आला समोर









