ADVERTISEMENT

घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा 500 वा भाग पूर्ण; निर्माते सोहम बांदेकर यांची भावूक प्रतिक्रिया

gharoghari matichya chuli serial 500 va bhag : ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय GharoGhari Matichya Chuli Serial ने नुकताच ५०० भागांचा टप्पा गाठला आहे. या यशानंतर निर्माते सोहम बांदेकर यांनी कृतज्ञता व्यक्त करत कलाकार व प्रेक्षकांचे विशेष आभार मानले आहेत.
gharoghari matichya chuli serial 500 va bhag

gharoghari matichya chuli serial 500 va bhag : मराठी मालिकाविश्वात लोकप्रिय ठरलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. केवळ दीड वर्षांच्या कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकत या मालिकेने 500भागांचा मैलाचा दगड पार केला आहे. या विशेष क्षणानिमित्त मालिकेचे निर्माता सोहम बांदेकर यांनी सोशल मीडियावरून भावूक प्रतिक्रिया देत प्रेक्षक, कलाकार आणि संपूर्ण टीमचे आभार मानले.

सोहम बांदेकर यांनी लिहिलं, “या प्रवासामागे सगळ्यांची मेहनत, शिस्त आणि अथक परिश्रम आहेत. या मालिकेला मिळालेल्या प्रचंड प्रेमासाठी प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार.” त्यांनी मालिकेतील प्रमुख कलाकारांनाही टॅग करून त्यांचे विशेष कौतुक केले.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे ही जानकीची भूमिका साकारते, तर सुमित पुसावळे ऋषिकेशच्या भूमिकेत दिसतो. या जोडीभोवतीच मालिकेची कथा फिरते आणि प्रेक्षकांकडून या ऑनस्क्रीन जोडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय प्रतीक्षा मुणगेकर, सविता प्रभुणे, आरोही सांभरे, ऋतुजा कुलकर्णी, आशुतोष पत्की यांच्यासारख्या दमदार कलाकारांनी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका टीआरपी शर्यतीत अव्वल स्थानावर झळकत आहे. नुकताच एका आठवड्यात या मालिकेने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. त्यामुळे केवळ कथानकच नव्हे तर कलाकारांचे अभिनय आणि प्रेक्षकांचा ओघ या सर्व गोष्टींमुळे मालिकेची लोकप्रियता वाढताना दिसते.

याआधी ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका देखील सोहम प्रॉडक्शननेच निर्मित केली होती. त्यामुळे एका मागोमाग दोन हिट मालिका देत सोहम बांदेकर यांच्या निर्मिती संस्थेने मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात ठसा उमटवला आहे.

हे पण वाचा.. Hrishikesh Shelar आणि Sneha Kate यांनी उलगडला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; भन्नाट उखाण्यांनी रंगली ‘आम्ही सारे खवय्ये’ची मैफिल

18 मार्च 2024 रोजी सुरू झालेली घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आता जवळपास दोन वर्षांच्या प्रवासात पोहोचली आहे. दरम्यान मालिकेत अनेक नवे ट्विस्ट, कौटुंबिक संघर्ष आणि हृदयाला भिडणारे प्रसंग दाखवले गेले, ज्यामुळे प्रेक्षकांचे या मालिकेशी घट्ट नाते जुळले आहे.

500 भागांचा टप्पा म्हणजे मालिकेच्या यशस्वी प्रवासाचं मोठं उदाहरण असून यापुढेही ही मालिका प्रेक्षकांना तितकीच भावेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे पण वाचा.. पारू फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने तब्बल वर्षभर लपवून ठेवलं लग्न; चाहत्यांना वाढदिवशी दिली  गुडन्यूज!

gharoghari matichya chuli serial 500 va bhag