gharoghari matichya chuli mask man kashyap parulekar new entry introduction : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली'(Gharoghari Matichya Chuli) सध्या उत्कंठेच्या शिखरावर पोहोचली आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला प्रश्न— मास्क घालून रणदिवे कुटुंबाला त्रास देणारा व्यक्ती नेमका कोण? —याचं उत्तर अखेर मिळालं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये या रहस्यमय पात्राचा चेहराही उघड झाला असून, ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर साकारताना दिसणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मालिकेच्या कथानकात मास्क मॅनची एन्ट्री झाल्यानंतर वातावरणात तणाव आणि रहस्याची झाक निर्माण झाली होती. या रहस्याचा धागा जानकीच्या भूतकाळाशी जोडलेला असल्याचं दाखवल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली होती. आणि आता कळतंय की, जानकीच्या आयुष्यात १२ वर्षांपूर्वी आलेला मकरंद हा व्यक्तीच आज मास्क मॅन बनून तिच्यासमोर उभा ठाकला आहे.
विशेष म्हणजे, या प्रसंगासोबतच मालिकेत एक वेगळं वळण घेण्यात आलं आहे. प्रेक्षकांना पुढील काही दिवसांत संपूर्ण फ्लॅशबॅक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. जानकी व हृषिकेशची प्रेमकहाणी, त्यांचा भूतकाळ, तसेच आश्रमात गेलेलं जानकीचं बालपण यामधून उलगडतंय. त्या काळात तिची खास मैत्रीण असलेली सायलीदेखील यामध्ये प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे.
कश्यप परुळेकर यांच्यासाठीही हे पुनरागमन खास आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या लोकप्रिय मालिकेतून त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. सुमारे १४ वर्षांनंतर ते पुन्हा स्टार प्रवाहवरील मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हे पण वाचा.. सोशल मीडियावर वैयक्तिक टीका; “कपिल होनराव” ची संतप्त प्रतिक्रिया व्हायरल!
आजपासून सुरू होणारे फ्लॅशबॅक एपिसोड्स संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित होतील.
या नवीन ट्विस्टनंतर ‘घरोघरी मातीच्या चुली’ चं कथानक नेमकं कोणता रंग धारण करणार, मास्क मॅनची पुढील चाल काय असणार आणि जानकीच्या आयुष्यात पुन्हा कोणते वादळ येणार, याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
मराठी टेलिव्हिजनवरील हा सस्पेन्स थरार आता आणखी रंगणार, एवढं मात्र नक्की!
हे पण वाचा.. पुन्हा शिवाजीराजे भोसले’साठी सिद्धार्थची निवड का केली? महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा









