ADVERTISEMENT

“गौतमी पाटीलवर संतापाचा स्फोट! पवन चौरेचा थेट सवाल – ‘तू महाराष्ट्राचा बिहार केलास का?’”

gautami patil pune apghat pavan choure santap : पुण्यातील अपघातानंतर लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या नावावर असलेल्या कारने रिक्षाला धडक दिल्याचा आरोप असून, अभिनेता पवन चौरेने सोशल मीडियावर तिच्यावर थेट निशाणा साधला आहे.
gautami patil pune apghat pavan choure santap

gautami patil pune apghat pavan choure santap : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण ठरलंय तिच्या नावावर असलेल्या गाडीचा झालेला अपघात. वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली असून या धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली असून, संबंधित वाहन गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातानंतर आता मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता पवन चौरे याने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत गौतमीवर थेट टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “गौतमी पाटील, तू महाराष्ट्राचा बिहार केलास. तू सामान्य लोकांना त्रास देण्याचं ठरवलंय का? तुझ्या गाडीने एका रिक्षाला उडवलं आणि तू तिथून निघून गेलीस. पोलिस यायच्या आधी तुझी कार तिथून हटवली गेली, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला,” असे गंभीर आरोप त्याने केले आहेत.

पवन चौरे पुढे म्हणतो, “रिक्षाचालक सध्या रुग्णालयात जीव-मरणाच्या झुंजेत आहे. एवढं सगळं घडूनही तू एकदा तरी माणुसकीच्या नात्याने विचारपूस केली नाहीस. हेच तुझे संस्कार आहेत का? सामान्य जनता तुला वर नेते आणि तीच जनता तुला खाली ओढू शकते, हे विसरू नकोस.”

दरम्यान, मंगळवारी पहाटे सुमारास झालेल्या या अपघातात जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांना तातडीने दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

या घटनेनंतर जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी पोलिस तपासावरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असून, पाटील यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली आहे. “या अपघातात गौतमी पाटील प्रत्यक्ष होती की नाही, हे स्पष्ट करा. संबंधित चालकाला अटक करा आणि वाहन जप्त करा,” अशा सूचना पाटील यांनी पोलिसांना दिल्याचं समजतं.

हे पण वाचा.. ‘प्रेमाची गोष्ट २’: रिधिमा पंडितचा मराठी चित्रपटसृष्टीत पहिला रोमॅंटिक सिनेमा

तसंच, जखमी रिक्षाचालकाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च गौतमी पाटील यांनी करावा, अशीही मागणी मंत्री पाटील यांनी केली आहे. दरम्यान, गौतमीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

या प्रकरणामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा गौतमी पाटील ट्रेंडिंगमध्ये आली आहे. काहींनी तिच्यावर टीका केली असून काही चाहत्यांनी घटनेची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सध्या तरी या प्रकरणावर पडदा पडण्याची चिन्हं दिसत नाहीत.

हे पण वाचा..लग्नाआधीचा मजेशीर किस्सा: मृणाल दुसानिसची नीरजसाठीची चिठ्ठी!

gautami patil pune apghat pavan choure santap