ADVERTISEMENT

‘स्वप्नांच्या पलीकडले’ची वैदेही आठवतेय? अभिनेत्री गौरी नलावडे चा बदललेला अंदाज पाहून चाहते थक्क

gauri nalawade sapnancha palikadle vaidehi glamorous look photos viral : ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Gauri Nalawade आज आपल्या नवनवीन लुकमुळे चर्चेत आहे. वैदेहीच्या साध्या रूपापासून ते आत्ताच्या ग्लॅमरस अंदाजापर्यंत तिचा बदल पाहून चाहते भारावून जात आहेत.
gauri nalawade sapnancha palikadle vaidehi glamorous look photos viral

gauri nalawade sapnancha palikadle vaidehi glamorous look photos viral : छोट्या पडद्यावर अनेक मालिका आल्या, अनेक गेल्या. पण काही मालिका मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्यापैकीच एक म्हणजे २०१० साली प्रसारित झालेली लोकप्रिय मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’. या मालिकेत अभिनेत्री गौरी नलावडे हिने साकारलेली वैदेही ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे.

त्या काळी मालिकेत वैदेही ही साधी, सोज्वळ, पारंपरिक रूपात दिसत असे. पण आता काळ बदलला तसा अभिनेत्रीचाही लुक पूर्णपणे बदलला आहे. आजची गौरी नलावडे खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते. सोशल मीडियावर ती सतत आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा हा बदलेला अंदाज पाहून चाहते भारावून जातात, इतकेच नव्हे तर तिच्या प्रत्येक नव्या पोस्टवर हजारोंच्या संख्येने कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतो.

‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेनंतर गौरी नलावडे ने आपला अभिनयाचा प्रवास थांबवला नाही. तिने विविध मराठी मालिकांमध्ये आणि काही चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या. तिच्या अभिनयातली सहजता आणि नैसर्गिकता यामुळे प्रेक्षक तिला नेहमीच पसंती देतात.

हे पण वाचा.. “जुई गडकरी ने दिली गुडन्यूज; घटस्थापनेच्या मुहूर्तावर लेखिका म्हणून नव्या इनिंगला सुरुवात”

लवकरच गौरी नलावडे पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिचा आगामी मराठी चित्रपट ‘वडापाव’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मालिकेतून साध्या वैदेहीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी गौरी नलावडे आज फॅशन-आयकॉन म्हणूनही नावारूपाला येत आहे. तिचा हा प्रवास आणि बदललेला अंदाज प्रेक्षकांसाठी तितकाच प्रेरणादायी ठरतो.

हे पण वाचा.. नॅशनल टीव्हीवर अविका गौरचं लग्न; अनुपम खेर, महेश भट्ट यांसारख्या दिग्गजांकडून शुभेच्छा

gauri nalawade sapnancha palikadle vaidehi glamorous look photos viral