gashmeer mahajani lakshmi nivas hindi serial : झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली होती. साधी कथा, भावनिक नाती आणि वास्तववादी मांडणी यामुळे या मालिकेने अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. आता याच मालिकेची हिंदी आवृत्ती झी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली असून १२ जानेवारी २०२६ पासून या मालिकेचा प्रवास सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या नव्या हिंदी मालिकेमुळे अभिनेता Gashmeer Mahajani पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकताना दिसत आहे.
या मालिकेच्या कथानकात नात्यांमधील प्रेम, त्यातील गुंतागुंत, त्यातून निर्माण होणारे संघर्ष आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी यांचा भावनिक वेध घेतला आहे. लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दाम्पत्य तब्बल ३५ वर्षांपासून एका भाड्याच्या खोलीत राहत आहेत. स्वतःच्या गरजा, स्वप्ने बाजूला ठेवून त्यांनी कुटुंबातील प्रत्येकासाठी आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींची लग्नं चांगल्या घरात व्हावीत, निवृत्तीनंतर एक स्वतःचं घर असावं, अशी साधी पण मनापासून जपलेली स्वप्नं हे दोघं उराशी बाळगून आहेत.
हिंदी ‘लक्ष्मी निवास’च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या प्रोमोंनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मालिकेत मानसी जोशी रॉय यांनी लक्ष्मीची भूमिका साकारली असून राजेंद्र चावला श्रीनिवासच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय अक्षिता मुग्दल, रिया मुंजाल आणि मानसी श्रीवास्तव यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
या सगळ्यात Gashmeer Mahajani ची एन्ट्री विशेष लक्षवेधी ठरते आहे. या मालिकेत तो आदित्य साहू या पात्राच्या भूमिकेत दिसत असून तो एक श्रीमंत, यशस्वी आणि मनाने प्रेमळ उद्योगपती आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे कथेला नवा रंग मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. गश्मीरने याआधी ‘इमली’ या स्टार प्लसवरील मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि त्यानंतर चाहते त्याला पुन्हा कधी पाहायला मिळणार, याची वाट पाहत होते.
हे पण वाचा.. सावली आई होणार का? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा भावनिक ट्विस्ट
मराठी चित्रपट, हिंदी मालिका, वेब सीरिज आणि रिअॅलिटी शोमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा Gashmeer Mahajani अखेर या नव्या मालिकेमुळे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या नव्या भूमिकेची झलक पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला असून अनेकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘लक्ष्मी निवास’ची ही हिंदी आवृत्ती पुढे कोणते वळण घेते, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : लावणीवरून घरात ठिणगी, दिपाली सय्यद–राधा पाटील वादामुळे दुसऱ्याच दिवशी रंगत









