gadi number 1760 या आगामी मराठी चित्रपटातील ‘झननन झाला’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं असून, प्रथमेश परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. आशिष कुलकर्णी यांच्या आवाजात आणि समीर सप्तीसकर यांच्या संगीतात सजलेलं हे गाणं, प्रेमाच्या नाजूक भावनांना स्पर्श करतंय. ४ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘gadi number 1760’ या आगामी चित्रपटाची मोठी चर्चा रंगली आहे. प्रेमाच्या जादुई प्रवासावर आधारित या सिनेमातील पहिलं गाणं ‘झननन झाला’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी प्रथमेश परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांची रंगतदार केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते आहे.
‘झननन झाला’ हे गाणं प्रेमात पडल्यावर हृदयात निर्माण होणाऱ्या आनंदाच्या, गोंधळलेल्या मनाच्या आणि त्या पहिल्या प्रेमाच्या धडधडण्याच्या भावना अगदी सुरेल पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये प्रेमाची नाजूक जाणीव लपलेली आहे. पहिल्या प्रेमाच्या मधुर आठवणी आणि मनातील गोंधळ यांचं चित्रण या गाण्यात उत्तमरीत्या साकारण्यात आलं आहे.
आशिष कुलकर्णी यांच्या मधुर आवाजाने या गाण्याला एक वेगळीच उंची दिली आहे. वैभव देशमुख यांनी लिहिलेले अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी शब्द हे गाणं अधिकच खुलवतात, तर संगीतकार समीर सप्तीसकर यांनी दिलेलं गोडसर संगीत प्रेक्षकांच्या मनात घर करतं. गाण्याचं नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांनी केलं असून, प्रत्येक स्टेपमध्ये त्यांनी तरुणाईच्या रोमँटिक भावनांना साकारलं आहे.
हे पण वाचा..मराठी अभिनेता tushar ghadigaonkar चं दु:खद निधन; नैराश्यातून घेतले टोकाचं पाऊल, मराठी मनोरंजनविश्व हादरलं
या गाण्याबाबत दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड सांगतात, ‘‘प्रेमात पडल्यावर मनात जे विचार आणि भावना निर्माण होतात, त्या शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. पण ‘झननन झाला’ गाणं त्या प्रत्येक भावना अगदी साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडतं. हे गाणं केवळ एक संगीत अनुभव नसून, ते प्रेमाच्या प्रवासाचा सुरुवातीचा टप्पा आहे. त्या नाजूक, गोंधळलेल्या आणि उत्साही क्षणांना आम्ही या गाण्यात पकडण्याचा प्रयत्न केला आहे.’’
तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘gadi number 1760’ या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन योगीराज संजय गायकवाड यांनी केलं असून, येत्या ४ जुलै रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
या चित्रपटात प्रथमेश परब, प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यासोबत शुभंकर तावडे, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रथमेश आणि प्रियदर्शिनी यांची फ्रेश आणि सहज केमिस्ट्री प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारी आहे, असं पहिलं गाणं पाहून स्पष्ट होतंय.
चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, ‘‘आजची पिढी प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यात थोडीशी संकोचते, पण ‘झननन झाला’ गाणं त्या भावना अतिशय प्रभावीपणे दाखवतं. हे गाणं प्रत्येक प्रेमवीराच्या मनात थेट पोहोचेल, अशी आम्हाला खात्री आहे. हे फक्त एक गाणं नाही, तर प्रेमाच्या गोड अनुभवांची एक सुंदर सफर आहे. प्रत्येक फ्रेममध्ये, प्रत्येक सुरात आणि प्रत्येक भावनेत प्रेमाची नशा भरलेली आहे. हे गाणं प्रेक्षकांनी अनुभवण्यासाठीच बनवलेलं आहे, ऐकण्यासाठी नव्हे.’’
हे पण वाचा..Marathi Actor Ajinkya Raut चा निर्मात्यांवर आरोप; म्हणतो, “९ लाख रुपये थकीत… आत्महत्या हा उपाय नाही!”
‘झननन झाला’ या गाण्याच्या माध्यमातून ‘gadi number 1760’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करतोय, हे निश्चित. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली असून, सोशल मीडियावरही या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. प्रेमाच्या हळव्या भावनांना नवीन चालीत गुंफणाऱ्या या गाण्यामुळे ‘gadi number 1760’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरेल, यात शंका नाही.
आता, 4 जुलै रोजी हा प्रेमाची गोड अनुभूती देणारा सिनेमा थिएटरमध्ये पाहायला मिळणार असून, प्रेमप्रसंगी मनात उमटणाऱ्या स्पंदनांना मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची ही एक अनोखी संधी ठरणार आहे.