ADVERTISEMENT

7 वर्षांच्या प्रेमानंतर ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्याने सांगितली संपूर्ण लव्ह स्टोरी

Dnyanada Ramtirthkar Love Story : लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा २३ डिसेंबर रोजी साखरपुडा पार पडला. सात वर्षांच्या नात्याचा प्रवास तिच्या होणाऱ्या नवऱ्याने भावनिक शब्दांत मांडला आहे.
Dnyanada Ramtirthkar Love Story

Dnyanada Ramtirthkar Love Story : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dnyanada Ramtirthkar सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. २३ डिसेंबर रोजी तिचा साखरपुडा पार पडला असून, त्याच दिवशी सकाळी तिने सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो आणि “आमचं ठरलं” असा भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आणि संध्याकाळपर्यंत साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

Dnyanada Ramtirthkar लवकरच हर्षद आत्माराम यांच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. हर्षद हा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असून तो एक सिनेमॅटोग्राफर आहे. साखरपुड्याच्या दिवशी ज्ञानदा अतिशय सोज्वळ आणि सुंदर दिसत होती. सोनेरी रंगाची साडी, हलका मेकअप आणि प्रसन्न चेहऱ्यावरचं हसू यामुळे तिचा लूक लक्षवेधी ठरला. तर हर्षदने पांढरा कुर्ता आणि आकाशी रंगाची कोटी असा साधा पण आकर्षक पोशाख केला होता. दोघांची केमिस्ट्री आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

या साखरपुड्यानंतर अनेकांना एक प्रश्न पडला होता, तो म्हणजे Dnyanada Ramtirthkar आणि हर्षद यांची ओळख कशी झाली? याचं उत्तर अप्रत्यक्षपणे स्वतः हर्षदने दिलं आहे. त्याने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमप्रवासाची झलक शब्दांत मांडली. “सात वर्ष प्रेमाची, धैर्याची, नकाराची आणि आयुष्य शिकवणाऱ्या धड्यांची… तरीही दररोज एकमेकांनाच निवडलं,” असं भावनिक कॅप्शन त्याने लिहिलं आहे. या ओळींमधून त्यांच्या नात्यातील संयम, संघर्ष आणि परस्परांवरील विश्वास दिसून येतो.

या पोस्टवरून हे स्पष्ट होतं की Dnyanada Ramtirthkar आणि हर्षद गेली सात वर्ष एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्रीने याआधी २०१९ मध्ये हर्षदसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. शिवाय ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या सेटवरून दोघांचा एक फोटोही कधीकाळी व्हायरल झाला होता, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती.

हे पण वाचा.. सांगलीत बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद गवळींनी सांगितला खास अनुभव

आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, सात वर्षांच्या प्रेमप्रवासानंतर दोघांनी साखरपुड्याच्या रूपाने नात्याला नवं नाव दिलं आहे. चाहत्यांकडून Dnyanada Ramtirthkar आणि हर्षद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांची ही प्रेमकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा.. स्टार प्रवाहची नायिका आता थेट सिनेमात! अनुष्का सरकटे–आयुष संजीव ‘जब्राट’ चित्रपटात एकत्र

Dnyanada Ramtirthkar Love Story