dipti bhagwat mulgi jui dashavtar marathi movie premier : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे दिप्ती भागवत. मालिकांपासून नाटकांपर्यंत आणि चित्रपटांपासून ते सूत्रसंचालनापर्यंत तिची दमदार उपस्थिती प्रेक्षकांनी अनुभवली आहे. सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वामुळे ती आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘दशावतार’ या बहुचर्चित सिनेमाच्या प्रीमियरलाही दिप्ती भागवतने उपस्थिती लावली होती, मात्र यावेळी चाहत्यांचं लक्ष वेधलं ते तिच्या मुलीने.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओत दिप्ती भागवत आपल्या लेकी जुई सोबत माध्यमांसाठी पोझ देताना दिसते. आई-मुलीचं हे खास बंधन पाहून चाहते भारावून गेले. अनेकांनी कमेंटमध्ये दिप्तीच्या सौंदर्याचं कौतुक करताना तिला “संतूर मॉम” अशी उपमा दिली. चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही की इतकी फिट आणि आकर्षक दिसणाऱ्या अभिनेत्रीची मुलगीदेखील चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावत आहे.
जुईने काही वर्षांपूर्वी अभिनयात पाऊल ठेवत ‘लाइक आणि सबस्क्राइब’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमातही ती झळकली. सोशल मीडियावर सक्रिय असलेली जुई आपल्या पोस्ट्समुळे तरुण चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या लुक्स आणि कॉन्फिडन्समुळे अनेकांना ती आईची कार्बन कॉपी वाटते.
हे पण वाचा.. “ललित-हृताचा ‘आरपार’ पाहून भावूक झाल्या मधुगंधा कुलकर्णी यांची खास पोस्ट चर्चेत
दिप्ती भागवतचं करिअर नेहमीच चर्चेत राहिलं आहे. नाटकं, मालिका, कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि विविध चित्रपटांतून तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे ती केवळ एक अभिनेत्री नसून मराठी इंडस्ट्रीतील बहुमुखी कलाकार म्हणून ओळखली जाते. प्रीमियरमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून अनेकांनी तिच्या फिटनेसचं कौतुक केलं.
‘दशावतार’ या सिनेमाच्या प्रीमियरमध्ये दिप्ती भागवत आणि तिची मुलगी जुई या दोघींची एंट्री चाहत्यांसाठी खास ठरली. आई-मुलीचं हे आकर्षक कॉम्बिनेशन पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. खरं तर, सौंदर्य आणि टॅलेंट दोन्हीही वारशाने मिळतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
हे पण वाचा.. अतुल गोगावले यांच्या पत्नी पूनम दिसतात अभिनेत्रीइतक्याच सुंदर; जाणून घ्या त्यांचा खास प्रवास









