dhurandhar song video pratik suresh : ‘धुरंधर’ या सिनेमाची क्रेझ अजूनही तितक्याच जोमात सुरू आहे. प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ कथानक आणि अभिनयच नाही, तर या सिनेमातील गाणीही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. ‘धुरंधर’मधील प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या ओठावर असून सोशल मीडियावर या गाण्यांवर बनवलेल्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
सामान्य प्रेक्षकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या गाण्यांच्या प्रेमात पडले आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता Pratik Suresh याचं नाव चर्चेत आलं आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अर्जुनच्या भावाची म्हणजेच अश्विनची भूमिका साकारणारा Pratik Suresh सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या कलागुणांची झलकही तो वेळोवेळी चाहत्यांना दाखवत असतो.
अलीकडेच Pratik Suresh ने ‘धुरंधर’ सिनेमातील रणवीर सिंगवर चित्रित झालेलं ‘कारवान’ हे गाणं स्वतःच्या आवाजात गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करताच तो वेगाने व्हायरल झाला. प्रतिकचा आवाज ऐकून अनेक चाहते थक्क झाले असून त्याने गाण्याला दिलेला हलकासा ट्विस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे. मूळ गाण्याची भावना जपून त्यात स्वतःचा अंदाज मिसळणं, हे त्याच्या चाहत्यांना खूपच भावलं आहे.
या व्हिडीओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी प्रतिकच्या आवाजाचं भरभरून कौतुक केलं आहे, तर काहींनी त्याला पुढे गायन क्षेत्रातही प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे Pratik Suresh सध्या केवळ अभिनयामुळेच नाही, तर त्याच्या गायनामुळेही चर्चेत आला आहे.
हे पण वाचा.. रमाच्या लग्नात मुकादमांची वरात! मुरांबा मालिकेचा प्रोमो चर्चेत
दरम्यान, ‘धुरंधर’ सिनेमाचं यशाचं वादळ काही केल्या थांबताना दिसत नाही. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सलग २३ दिवस बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. देशातच नव्हे तर परदेशातही या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून ‘धुरंधर’ने १००० कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सिनेमाची लोकप्रियता, गाण्यांची क्रेझ आणि कलाकारांचा प्रभाव यामुळे ‘धुरंधर’ सध्या मनोरंजन विश्वात केंद्रस्थानी आहे.
हे पण वाचा.. निलेश साबळे स्वतःचं चॅनेल सुरू करणार!भाऊ कदमांचा ‘उगाच अवॉर्ड’मधील भन्नाट खुलासा







