ADVERTISEMENT

धोकेबाज अंशुमनचा नवा डाव! चिंगीला विसरून सुष्मिताशी लग्न, ग्रँड रिसेप्शनच्या मागणीने स्वानंदी अडचणीत

dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena : 'वीण दोघांतही ही तुटेना' मालिकेत प्रेक्षकांना धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. चिंगी गरोदर असतानाच अंशुमनने सुष्मिताशी लग्न केल्याने स्वानंदी हादरली आहे. त्यातच सुष्मिताने राजवाडे कुटुंबासमोर ग्रँड रिसेप्शनची मागणी करत नवा वाद निर्माण केला आहे.
dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena

dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतही ही तुटेना’ सध्या अतिशय नाट्यमय टप्प्यावर पोहोचली असून आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत. अंशुमनच्या निर्णयामुळे स्वानंदी, समर आणि संपूर्ण राजवाडे कुटुंब नव्या संकटात सापडल्याचं चित्र मालिकेत दिसून येत आहे.

चिंगी गरोदर असल्याने तिच्या होणाऱ्या बाळाची जबाबदारी स्वीकारून अंशुमनने तिच्यासोबत संसार थाटावा, अशी स्वानंदीची स्पष्ट अपेक्षा होती. मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलत जाते. मल्लिका स्वतःचा डाव यशस्वी करण्यासाठी मंदाकिनीला आर्थिक प्रलोभन दाखवते आणि त्यानंतर अंशुमन व सुष्मिताचं लग्न घडवून आणते. ही घटना समोर आल्यानंतर स्वानंदीसाठी हा मोठा धक्का ठरतो. कारण अंशुमनने यापूर्वी अनेक महिलांची फसवणूक केल्याचं सर्वांनाच माहिती असताना, त्याच्याशी स्वतःच्या बहिणीचं लग्न होणं तिला अजिबात मान्य नसतं.

याचबरोबर चिंगीवर झालेला अन्यायही स्वानंदीला अस्वस्थ करतो. या सर्व प्रकाराची माहिती समरला मिळताच त्याचा संताप अनावर होतो. तो अंशुमनला जाब विचारतो. मात्र अंशुमनला आपल्या वागण्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचं दिसून येतं. उलट अर्पिता त्याची बाजू घेत समरला अंशुमन किती चांगला आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. यावेळी ती स्वानंदीबद्दलही अपमानास्पद वक्तव्य करते.

स्वानंदीचा अपमान झाल्याचं पाहून समरचा संयम सुटतो. तो अर्पिताला स्पष्ट शब्दांत सुनावतो आणि तिने आपलं सामान आवरून माहेरी निघून जावं, असं सांगत तिला घराबाहेर जाण्यास भाग पाडतो. मात्र यानंतरही घरातील तणाव कमी होत नाही.

मल्लिका पुन्हा एकदा आपली खेळी सुरू करते. स्वानंदीला आता स्वतःचीच बहीण तिच्यासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचा इशारा देत ती सुष्मिताच्या मनातही विविध गोष्टी भरवते. त्याचा परिणाम म्हणून सुष्मिता राजवाडे कुटुंबासमोर एक आगळीवेगळी मागणी ठेवते.

ती घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावून सांगते की, तिचं आणि अंशुमनचं लग्न गुप्तपणे झालं असून तिला त्यांच्या लग्नाचं मोठ्या थाटामाटात रिसेप्शन हवं आहे. जर कुटुंबाने तिची इच्छा पूर्ण केली नाही, तर आपण अन्न-पाणी त्याग करू, अशी धमकीदेखील ती देते.

हे पण वाचा.. तुझा बाप कोण?”; कमळीच्या आईच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह, नयनताराच्या अपमानानंतर हृषीसमोर उभा राहिला मोठा पेच

dhokebaj anshuman sushmita grand risepashan swanandi veen doghantahi hi tutena

आता सुष्मिताचा हा हट्ट स्वानंदी मान्य करणार का? समर या परिस्थितीत कोणता निर्णय घेणार? आणि मल्लिकाच्या डावांना स्वानंदी कसं प्रत्युत्तर देणार? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. प्रेक्षकांना हा नवा ट्विस्ट किती भावतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘वीण दोघांतही ही तुटेना’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.

हे पण वाचा.. कमळीच्या सेटवरील अनिकाचा अंगावर शेण-चिखल उडाल्याचा सीन ऑफस्क्रीन कसा झाला शूट? BTS व्हिडीओ व्हायरल