ADVERTISEMENT

“भाई… तू नड!” प्रणीत मोरेच्या पाठीशी उभा धनंजय पोवार; म्हणाला, “मराठी इंडस्ट्रीनं दाखवावी एकजूट”

dhananjay powar stands with praneet more bigg boss 19 : बिग बॉस १९ मधील प्रणीत मोरेवर टीका करणा-यांना अभिनेता Dhananjay Powar यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रणीतच्या खेळाचं कौतुक करताना धनंजयने मराठी कलाकारांनी एकत्र येऊन त्याला साथ द्यावी, असं आवाहन केलं आहे.
dhananjay powar stands with praneet more bigg boss 19

dhananjay powar stands with praneet more bigg boss 19 : ‘बिग बॉस मराठी १९’चा सीझन जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत चालला आहे. या घरातील स्पर्धक प्रणीत मोरे सुरुवातीपासूनच आपल्या विनोदी स्वभावाने आणि प्रामाणिक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचं कौतुक केवळ प्रेक्षकांकडूनच नव्हे, तर इंडस्ट्रीमधील कलाकारांकडूनही होत आहे. आता त्याच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलाय अभिनेता Dhananjay Powar.

धनंजय पोवारनं नुकताच एक व्हिडिओ शेअर करत प्रणीतला दिलेला पाठिंबा स्पष्ट केला. या व्हिडिओत त्याने प्रणीतच्या व्यक्तिमत्त्वावर आणि खेळावर टीका करणा-यांना सडेतोड उत्तर दिलं. “प्रणीत मराठी आहे म्हणून त्याला सपोर्ट करतोय असं नाही. पण त्याच्यावर दिसण्यावरून, बोलण्यावरून टीका करणं योग्य नाही. जर मराठी असल्यामुळे एखाद्याला कमी लेखलं जात असेल, तर आम्ही नक्कीच त्याच्या मागे उभे राहू,” असं धनंजय म्हणाला.

त्याने पुढे सांगितलं की, प्रणीत घरात टास्क उत्कृष्ट पार पाडतोय. त्याची वागणूक आणि रणनीती दोन्ही जबरदस्त आहेत. “तो ज्या पद्धतीनं घरात वावरतोय, त्यावरून स्पष्ट आहे की तो केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रेक्षकांचा विश्वास जिंकण्यासाठीही प्रयत्नशील आहे,” असं धनंजयनं स्पष्ट केलं.

धनंजयनं यावेळी बसीर अलीवरही भाष्य करत त्याच्यावर थेट टीका केली. “बसीर, आता तू घरातून बाहेर पडला आहेस. त्यामुळे तू घरी जाऊन तोंड धू आणि कपडे घाल,” असं म्हणत त्यानं त्याचं नाव घेत विनोदी शैलीत समाचार घेतला.

व्हिडिओच्या शेवटी धनंजयनं मराठी कलाकारांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं. “आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीनं आता प्रणीतसारख्या स्पर्धकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करा. तो जिंकलं म्हणजे मराठी माणूस जिंकला असं होईल,” असं तो म्हणाला.

हे पण वाचा.. “सतीश शाह यांच्या निधनाने बॉलीवूड शोकमग्न; जिनिलीया देशमुखसह सेलिब्रिटींच्या भावना ओसंडल्या”

धनंजय पोवारनं शेवटी प्रणीतला उद्देशून म्हटलं, “भाई… तू नड! आम्ही इथे छाती ठोकून बसलोय. बिनधास्त खेळ. तुझ्या विजयात महाराष्ट्राचा सन्मान दडलेला आहे.”

धनंजयच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी प्रणीतला पाठिंबा दर्शवला असून, “Dhananjay Powar सारखे कलाकार जर पुढे आले, तर मराठी मनोरंजन क्षेत्र आणखी मजबूत होईल,” अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

हे पण वाचा.. भाग्यश्री मोटेचं स्वप्न पूर्ण! मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर; म्हणाली, “१४ वर्षांपूर्वी सुरू झाला होता हा प्रवास”

dhananjay powar stands with praneet more bigg boss 19