ADVERTISEMENT

“महादेवी हत्तीण आम्हाला परत द्या!” – Dhananjay Powar चा भावनिक साद;नांदणी गावात शोककळा

Dhananjay Powar

बिग बॉस फेम Dhananjay Powar ने नांदणी गावातील महादेवी हत्तीणीसाठी सरकार आणि प्रशासनाला भावनिक साद घातली आहे. लाखों लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, या हत्तीणीला परत आणण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

भावनांचा उद्रेक! महादेवी हत्तीणीच्या विठीने नांदणी गावात हळहळ – धनंजय पोवारचा सरकारला भावनिक साद

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव सध्या एका भावनिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात वास्तव्य करणारी आणि गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याची झालेली महादेवी हत्तीण, अचानक वनविभागाने गुजरातमध्ये वंतारा येथे हलवली. यामुळे संपूर्ण गावामध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

हे पण वाचा..“Vallari Viraj चा ‘मैं अलबेली’ डान्स व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांचं प्रेम आणि कमेंट्सचा वर्षाव!”

महादेवी हत्तीण ही जैन मंदिराच्या परिसरात राहात होती आणि तिला केवळ हत्तीण म्हणून नाही, तर देवीच्या रूपात पूजलं जात होतं. तिच्या निरोपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, गावकरी अश्रूंनी भरलेले दिसत आहेत. या घटनेवर आता प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम Dhananjay Powar उर्फ डीपीदादाने स्वतःचा व्हिडीओ शेअर करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

Dhananjay Powar म्हणतो, “ही लढाई पैशासाठी नाही, ही लढाई भावनांसाठी आहे. महादेवी ही हत्तीण नाही तर गावाची जाणीव आहे. तिच्याशी जोडलेली असलेली माणसं, प्रेमाने पोसलेली नाती… तुम्ही हे सर्व एका निर्णयाने मोडून काढलं आहे.”

पुढे बोलताना Dhananjay Powar म्हणतो, “हजारो लोकांचा प्रेमभाव आणि श्रद्धा महादेवीशी जोडलेला आहे. तिला वनविभागात नेऊन तुम्ही केवळ एका प्राणीला हलवलं नाही, तर संपूर्ण गावाच्या आत्म्याचा एक भाग उडवून नेला आहे. या भावनिक वेदनेचा तुम्ही विचार करा.”

Dhananjay Powar च्या व्हिडीओला हजारो लोकांनी साथ दिली आहे. अनेकांनी महादेवीला परत आणण्याची मागणी केली असून, सरकार आणि संबंधित यंत्रणांनी जनतेच्या भावनांचा विचार करावा, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.

सध्या या प्रकरणावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असून, “महादेवी आम्हाला परत द्या” ही हाक आंदोलनात बदलण्याची शक्यता आहे. हे केवळ हत्तीणीचं प्रकरण नाही, तर ही माणुसकीच्या नात्यांची भावना आहे – जी जनतेच्या हृदयातून उमटत आहे.

हे पण वाचा.. Chala Hava Yevu Dya ’च्या नव्या पर्वात हास्यजत्रेचा आणखी एक कलाकार