devoleena bhattacharjee salman khan bigg boss vivad : वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन १९’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रत्येक आठवड्यात या शोमध्ये काही ना काही गोंधळ निर्माण होतोच आणि त्याचा शेवट ‘विकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खानच्या फटकारणीने होतो. परंतु यावेळी प्रेक्षकांसोबतच काही माजी स्पर्धकांनीही सलमान खान आणि बिग बॉसवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. कुनिका सदानंद यांनी ‘सूर-सुरी’ या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, तर अमाल मलिकने अशनूर कौरबद्दल ‘भुंकणे’ हा शब्द वापरल्याने वातावरण तापले. याशिवाय अभिषेक बजाज आणि नेहल चुडासमा यांच्या वर्तनावरूनही घरात तणाव वाढला होता. या सर्व प्रकरणांवर ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने काही स्पर्धकांना फटकारलं, पण त्याचवेळी अमाल मलिक आणि तान्या शर्माचे कौतुक करून त्यांना पाठिंबा दिला.
याच मुद्द्यावरून सलमानवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी सलमानला ट्रोल करत म्हटलं की, “अमालच्या बाजूने सलमान उघडपणे झुकला.” यामध्ये आता देवोलीना भट्टाचार्जीचाही आवाज जोडला गेला आहे.
‘बिग बॉस’च्या एका चाहतावर्गाच्या पेजवर ‘विकेंड का वार’मधील अमाल मलिक आणि शहबाज बदेशा यांचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “परिस्थिती उत्तमरीत्या हाताळल्याबद्दल सलमान खानला अमालचा अभिमान आहे.” ही पोस्ट पाहिल्यानंतर देवोलीना भट्टाचार्जीने आपल्या एक्स (Twitter) हँडलवर प्रतिक्रिया देताना लिहिलं, “ओह प्लीज… मी फक्त बदलासाठी हा ‘विकेंड का वार’ पाहिला, पण इतक्या चुका आणि मूर्खपणा एकाचवेळी कधी पाहिला नव्हता.”
तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा भडका उडाला आहे. अनेक प्रेक्षक देवोलीनाच्या मताशी सहमत असल्याचं दिसून येतं. काहींनी तिला पाठिंबा देत म्हटलं की, “तीने जे बोललं ते खरं आहे. सलमान आता स्पर्धकांबद्दल निष्पक्ष राहत नाही.”
हे पण वाचा.. कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा आई होणार; पती हर्ष लिंबाचियासोबत शेअर केली आनंदाची बातमी
देवोलीना भट्टाचार्जी याआधीही ‘बिग बॉस’मध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिचं हे नवीन वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं असून, शोमधील ‘फेव्हरिटिझम’च्या चर्चेला अधिक उधाण आलं आहे. प्रेक्षक आता सलमान खान आणि निर्मात्यांनी या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली जाईल, याकडे लक्ष ठेवून आहेत.
हे पण वाचा.. पिंगा ग पोरी पिंगा मालिकेचे 300 भाग पूर्ण सेटवर कलाकारांचं जंगी सेलिब्रेशन Pinga Ga Pori Pinga Serial
devoleena bhattacharjee salman khan bigg boss vivad
Situation ko achhe se handle karne ke liye Salman Khan is very proud of @AmaalMallik! 😍#BB19 #BiggBoss19 #BiggBoss @BeingSalmanKhan pic.twitter.com/QP4wBIVUJx
— Bigg Boss (@BiggBoss) October 4, 2025









