ADVERTISEMENT

देवमाणूस मध्ये मोठा उलटफेर; लालीच्या हातात सूत्रं, गोपाळवर पूर्ण ताबा – नवा प्रोमो चर्चेत

devmanus lali gopal new twist promo : देवमाणूस मालिकेत लाली आणि गोपाळच्या नात्यात अनपेक्षित वळण आले आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे कथानकाचा रोख बदलताना दिसत असून नेटकरीही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
devmanus lali gopal new twist promo

devmanus lali gopal new twist promo : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Devmanus सध्या प्रेक्षकांना धक्क्यावर धक्का देत आहे. ‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकेतील कथानक दिवसेंदिवस अधिक गडद आणि गुंतागुंतीचं होत चाललं आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत लालीने आर्याचा खून केल्याचं उघड झालं, मात्र हे सत्य अजूनही गावकऱ्यांपासून आणि पोलीस तपासापासून लपलेलं आहे. आर्या आता जिवंत नाही, ही गोष्ट फक्त लाली आणि गोपाळलाच माहीत आहे, आणि याच रहस्यावर सध्या संपूर्ण कथा उभी आहे.

इन्स्पेक्टर जामकर यांना सुरुवातीपासूनच गोपाळवर संशय आहे. गोपाळचा स्वभाव, त्याच्या हालचाली आणि लोकांना फसवण्याची पद्धत जामकरच्या नजरेतून सुटलेली नाही. मात्र ठोस पुराव्याअभावी तो मोकळा होता. आर्याशी संबंधित रुग्णालयातील एक महत्त्वाचा कागद आणि गोपाळ तिच्यासोबत दवाखान्यात गेल्याचा पुरावा मिळाल्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण गोपाळने गुन्हा मान्य केला नाही.

या सगळ्यात लालीने अत्यंत हुशारीने डाव खेळला. गोपाळची सुटका व्हावी यासाठी ती थेट इन्स्पेक्टर जामकरला भेटते आणि एक भावनिक कथा सांगते. आर्या प्रेग्नंट होती, तपासणीसाठी तिला दवाखान्यात जायचं होतं, पण स्वतः आजारी असल्याने गोपाळला तिच्यासोबत पाठवलं, असं ती सांगते. शिवाय शपथेचं कारण देत गोपाळ गप्प राहिल्याचंही ती स्पष्ट करते. आर्या सध्या कुठे आहे, कोणाबरोबर गेली आहे, याची माहिती नसल्याचं सांगत लाली जामकरचा संशय दूर करण्यात यशस्वी ठरते.

आता मात्र Devmanus च्या नव्या प्रोमोने कथेला वेगळंच वळण दिलं आहे. या प्रोमोमध्ये लाली पूर्णपणे सत्तेच्या भूमिकेत दिसते, तर गोपाळ तिच्या इशाऱ्यावर वागणारा, चिडचिडा आणि दबलेला वाटतो. घरातील सगळी कामं तो करताना दाखवण्यात आली आहेत, आणि शेवटी लालीसमोर शरणागती पत्करल्यासारखा त्याचा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळतो. लालीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि विजयाची झलक स्पष्ट दिसते.

हे पण वाचा.. काय कपडे घालतेस?” ट्रोलर्सना केतकी कुलकर्णीचा सडेतोड उत्तर; म्हणाली, पात्र आणि व्यक्ती यातील फरक समजून घ्या

या प्रोमोवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी लालीने ‘देवमाणसाचा उंदीर केला’ अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी लालीला ‘शेरास सव्वाशेर’ म्हटलं आहे. काही प्रेक्षकांनी पुढे लालीचाच अंत होईल असा अंदाजही व्यक्त केला आहे. एकूणच Devmanus मालिकेतील हा नवा टप्पा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरत असून, पुढील भागांमध्ये आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. लग्नाची घाई आणि मतभेद…म्हणून ब्रेकअप प्रियदर्शिनी इंदलकरचा स्पष्ट खुलासा

devmanus lali gopal new twist promo