devmanus fame asmita deshmukh online paise fasavnuk event scam marathi news : मराठी मनोरंजनविश्वात ‘देवमाणूस’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली आणि त्यानंतर ‘तुझी माझी जमली जोडी’ सारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री Asmita Deshmukh अलीकडेच एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीतून तिने आपल्याबरोबर झालेल्या फसवणुकीचा अनुभव शेअर केला असून, इतर कलाकारांना व चाहत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अस्मिता देशमुखने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ती एका दहिहंडी कार्यक्रमात सहभागी झाली होती. हा कार्यक्रम आयोजक सुजित सरकाळे याने तिला दिला होता. इव्हेंटला जाण्यापूर्वी त्याने तिला ऑनलाईन पेमेंट केल्याचे काही स्क्रीनशॉट्स पाठवले. या स्क्रीनशॉट्समध्ये रक्कम जमा झाल्याचे दिसत होते, पण प्रत्यक्षात तिच्या खात्यात पैसे आलेच नव्हते. जेव्हा तिने विचारणा केली तेव्हा आयोजकाने “बँकेची सर्व्हर समस्या आहे” अशी कारणं सांगितली.
एक-दोन दिवस थांबूनही पैसे न आल्याने अखेर अस्मिताला कळलं की ही केवळ तांत्रिक अडचण नसून मोठा स्कॅम आहे. “तो असे दाखवतो की पैसे आले आहेत, पण प्रत्यक्षात ते खात्यात जमा होत नाहीत. हा फसवणुकीचा प्रकार गुगल पे, फोन पे अशा अॅप्सच्या माध्यमातून होतो,” असं ती म्हणाली.
यानंतर अभिनेत्रीने संबंधित व्यक्तीकडे वारंवार पैसे मागितले, मात्र काहीही परिणाम झाला नाही. शेवटी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. “फक्त माझ्यासोबतच नाही, तर इतर कलाकारांसोबतही त्याने अशीच फसवणूक केली आहे,” असं अस्मिताने स्पष्ट केलं.
हे पण वाचा.. “‘तुला जपणार आहे’ फेम शर्वरी लोहकरे म्हणाली – ती वेळ खूप काही शिकवून गेली; संघर्षकाळावर पहिल्यांदाच भाष्य”
तिने व्हिडिओ संदेशात म्हटलं, “मी सर्वांना कळकळीची विनंती करते की या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा इव्हेंट करू नका. जर कार्यक्रम स्विकारलाच, तर आधी पैसे अकाऊंटमध्ये आलेत की नाही याची खात्री करूनच पुढे जा. ही फसवणूक माझ्याबाबतीत झाली आहे, पण इतरांच्या बाबतीत होऊ नये, म्हणून हा अनुभव मी शेअर केला.”
सोशल मीडियावर अस्मिता देशमुखचा हा इशारा सध्या जोरदार व्हायरल होत असून, अनेक चाहत्यांनी तिच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. या घटनेनंतर कलाकारांसह चाहत्यांमध्येही ऑनलाईन व्यवहारांबाबत जागरुकता वाढताना दिसत आहे.
हे पण वाचा.. “‘बिग बॉस’मधून सुरु झालेली लव्हस्टोरी… आता लेकीच्या वाढदिवसाने रंगली राहुल–दिशाची दुनिया,पाहा खास फोटो”









