ADVERTISEMENT

झी मराठीवर ‘दीपज्योती’ची एंट्री! ८ वाजताचा स्लॉट, ‘लक्ष्मी निवास’चं काय?

DeepJyoti Marathi Serial Date Time Cast Details : झी मराठीवर ‘DeepJyoti’ ही नवी मालिका १३ एप्रिलपासून सुरू होत असून, पूर्वा कौशिक, प्रसाद जवादे आणि गिरीश ओक यांच्या दमदार भूमिकांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ८ वाजताच्या स्लॉटमुळे ‘लक्ष्मी निवास’चं काय होणार याचीही चर्चा रंगली आहे.
DeepJyoti Marathi Serial Date Time Cast Details

DeepJyoti Marathi Serial Date Time Cast Details : झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा सिलसिला सुरू असताना आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘DeepJyoti’ ही नवी मालिका येण्यासाठी सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेची घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये तिची उत्सुकता निर्माण झाली होती. ‘सनई चौघडे’नंतर आता ‘DeepJyoti’ ही मालिका १३ एप्रिलपासून रात्री ८ वाजता प्राइम टाइममध्ये प्रसारित होणार आहे.

या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची उपस्थिती ही मालिकेची मोठी जमेची बाजू ठरणार आहे. ‘लाखात एक आमचा दादा’मधील त्यांची ‘डॅडी’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे ‘DeepJyoti’मध्ये ते पुन्हा एका दमदार भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये खास उत्साह पाहायला मिळतोय. या मालिकेत ते ‘पुरुषोत्तम’ या कुटुंब प्रमुखाची भूमिका साकारणार आहेत.

मालिकेच्या प्रोमोमधून कथानकाची झलकही समोर आली आहे. ‘DeepJyoti’ ही कथा एका कुटुंबाभोवती फिरते, जिथे तीन बहिणी आणि एक भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करत आनंदाने आयुष्य जगताना दिसतात. मात्र, दुसऱ्या बाजूला नायक दीप हा श्रीमंत घरातील असूनही दारूच्या आहारी गेलेला दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी नायिका ज्योती ही साध्या कुटुंबातील असून तिचा भाऊ रिक्षा चालवत कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो.

कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे एका अपघातात ज्योतीच्या भावाचा आणि तिच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू होतो. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पुढे ज्योती हे कुटुंब कसं सावरणार, ती संकटांना कशी सामोरी जाणार, याची भावनिक आणि प्रेरणादायी कहाणी ‘DeepJyoti’मधून पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, या मालिकेला ८ वाजताचा स्लॉट देण्यात आल्यामुळे सध्या त्याच वेळेला प्रसारित होणाऱ्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक प्रेक्षकांच्या मते ही मालिका बंद होऊ शकते, तर काहींच्या मते तिची वेळ बदलली जाईल. सोशल मीडियावर मात्र ‘लक्ष्मी निवास’ बंद करू नये, अशी मागणीही जोर धरताना दिसत आहे.

हे पण वाचा.. लक्ष्मी निवास मध्ये ललित प्रभाकरची एन्ट्री; जान्हवीमुळे जयंतचा संताप, मालिकेत मोठा ट्विस्ट

DeepJyoti Marathi Serial Date Time Cast Details

एकंदरीत, दमदार कलाकार, भावनिक कथानक आणि नात्यांमधील गुंतागुंत यामुळे ‘DeepJyoti’ ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या नव्या मालिकेच्या आगमनानंतर टीआरपीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. प्रियाचं खोटं पकडणार सायली? एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट