ADVERTISEMENT

ज्वारीची भाकरी ते सायकलिंगपर्यंत – दीपाली पानसरेचा साधा आणि प्रभावी वेट लॉस फॉर्म्युला

deepali pansare weight loss routine : मराठी अभिनेत्री दीपाली पानसरे सध्या तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून ती तिची साधी, पण प्रभावी दिनचर्या चाहत्यांसमोर मांडते आहे.
deepali pansare weight loss routine

deepali pansare weight loss routine : आजच्या धावपळीच्या आयुष्यात फिट राहणं अनेकांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. वजन कमी करायचं असेल किंवा फिटनेस टिकवून ठेवायचा असेल, तर त्यासाठी सातत्य, शिस्त आणि जीवनशैलीत बदल आवश्यक असतात. हाच संदेश सध्या मराठी अभिनेत्री Deepali Pansare तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासातून देताना दिसत आहे.

दीपाली पानसरेने अलीकडेच सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर करत तिच्या फिटनेस जर्नीबद्दल खुलेपणाने सांगायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओंमधून ती केवळ व्यायामच नव्हे, तर संपूर्ण दिनचर्या कशी बदलली आहे, हेही दाखवते. Deepali Pansare चा हा प्रवास पाहता, वजन कमी करणं म्हणजे उपासमार नव्हे, तर योग्य वेळेवर आणि योग्य आहार घेणं असल्याचं स्पष्ट होतं.

ती दिवसाची सुरुवात लवकर उठून चालण्याने करते. सकाळी चालताना ‘साखर आणि जंक फूड नाही’ असा ठाम निर्णय तिने घेतल्याचं दिसतं. वजन वाढीचं मुख्य कारण असलेल्या साखरेपासून दूर राहणं, हा तिच्या बदललेल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. चालून आल्यानंतर ती चिया सीड्स टाकलेलं लिंबू पाणी पिते, त्यानंतर ब्लॅक कॉफी घेतल्याचं ती व्हिडीओमध्ये सांगते.

दुपारचं जेवणही Deepali Pansare अगदी संतुलित पद्धतीने घेते. साडेबारा वाजता ती जेवण करते आणि त्यात ज्वारीची भाकरी, भाजी, डाळ, दही आणि सलाड यांचा समावेश असतो. पारंपरिक, घरगुती आणि पौष्टिक आहारावर तिचा भर आहे. विशेष म्हणजे ती रोज एकसारखं न खाता, थोडेफार बदल करून जेवण घेत असल्याचंही दिसून येतं.

संध्याकाळचं जेवण ती रात्री सातच्या आत पूर्ण करते. जेवणानंतर सायकलिंग करून शरीर सक्रिय ठेवते आणि दिवसाचा शेवट प्रोटीन शेकने करते. ही शिस्तबद्ध दिनचर्या तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

दीपाली पानसरेच्या या व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांनी “तुम्ही आधीपासूनच फिट आहात”, “आम्हालाही प्रेरणा मिळतेय”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. हार्ट इमोजी आणि कौतुकाच्या कमेंट्समधून तिच्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद दिली जात आहे.

हे पण वाचा.. लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता ऋत्विक तळवलकर अडकला लग्नबंधनात; शाही सोहळ्यात अनुष्कासोबत घेतले सात फेरे

मराठी आणि हिंदी मालिकाविश्वात Deepali Pansare हे नाव परिचित आहे. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘देवयानी’, ‘आई कुठे काय करते’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. आता अभिनयासोबतच तिचा फिटनेस प्रवासही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे पण वाचा.. सासरी गेल्यावर सर्व सहन करायलाच हवं असं नाही तेजश्री प्रधान हिने दिलेला स्पष्ट संदेश, व्हिडीओने वेधलं लक्ष

deepali pansare weight loss routine