ADVERTISEMENT

‘दशावतार’चा गूढ चेहरा आला समोर; दिलीप प्रभावळकर नव्या रूपात झळकणार?

दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचं गूढ, रहस्यमय पोस्टर सध्या चर्चेत आहे. कोकणातील दशावतारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकरांचं वेगळंच रूप पाहायला मिळणार असल्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दशावतार

मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळंवेगळं आणि गूढतेने भरलेलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं आहे – ‘दशावतार’. या चित्रपटाच्या पोस्टरने केवळ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली नाही, तर त्या पोस्टर मधील चेहरा कोणत्या कलाकाराचा आहे हा प्रश्न सर्वांनाच  पडलेला होता आणि चेहरा कोणाचा असेल यावर तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती .पोस्टरमध्ये दाखवलेला चेहरा काळसर रंगाने रंगवलेला, रौद्र आणि लालसर डोळ्यांनी ओतप्रोत भरलेला आहे. त्याचा कटाक्ष डोळ्यांत साठवणारा आणि अंतर्मनाला अस्वस्थ करणारा आहे.

परंतु आता प्रेक्षकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत तर ही भूमिका दिलीप प्रभावळकर यांची असण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती आता ती शक्यता खरी ठरत आहे . दिलीप प्रभावळकर यांच्या इतक्या वेगळ्या रूपातील उपस्थितीने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोकणातील दशावतारी परंपरेवर आधारित कथा

‘दशावतार’ चित्रपटाचा मूळ पाया कोकणातील दशावतारी परंपरेवर आधारित असून, या परंपरेतील गूढता, देवत्व, आणि लोककथा यांचा सुंदर मिलाफ यात पाहायला मिळणार आहे. लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन स्वतः केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीतही त्यांनी भाग घेतला आहे.

हे पण वाचा..71st National Film Awards : मराठी सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसा या चित्रपटांना मिळाला मोठा सन्मान!

५० दिवस कोकणात सलग चित्रीकरण

चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोकणातील नयनरम्य आणि पारंपरिक वातावरणात सलग ५० दिवसात पार पडले. त्यामुळे कोकणचं सौंदर्य आणि संस्कृती प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर जिवंतपणे अनुभवायला मिळणार आहे.

पोस्टरमधील चेहरा कोणाचा?

दिलीप प्रभावळकरांचं नाव पोस्टरमधील चेहऱ्याशी जोडलं जात असलं तरी, त्याचं अधिकृत खुलासे १२ सप्टेंबरपर्यंत होणार नाही. त्यांचा हा वेगळा लूक आणि गूढ चेहरा कोणत्या भूमिकेचं प्रतीक आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

तगडी टीम आणि सशक्त निर्मिती

चित्रपटाच्या निर्मितीत सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन व मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, आणि विनायक जोशी यांचा सहभाग असून, कलानिर्माते म्हणून अजित भुरे कार्यरत आहेत.

१२ सप्टेंबरला पडदा उघडणार

चित्रपटाच्या पोस्टरने ज्या प्रकारे वातावरण निर्माण केलं आहे, ते पाहता ‘दशावतार’ चित्रपटाची प्रतिक्षा आता अधिकच वाढली आहे. त्यात दिलीप प्रभावळकरांची नवी रूपं, कोकणातील दशावतारी परंपरेचं भव्य दर्शन आणि गूढतेचा अनुभव मिळणार असल्याने हा चित्रपट नक्कीच विशेष ठरणार आहे.

हे पण वाचा. Chhaya Kadam कोकणात रमल्या; साधेपणाने जिंकली मने, खास क्षण चाहत्यांसोबत शेअर