danashree kadgaonkar beautiful hair secret : मराठी टेलिव्हिजन विश्वातील नावाजलेली अभिनेत्री Danashree Kadgaonkar हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘रुंजी’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘तू चाल पुढं’ अशा मालिकांमधून तिने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील तिचं “वहिनीसाहेब” हे पात्र तिच्या करिअरचं टर्निंग पॉइंट ठरलं. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. बराच काळ ती पडद्यापासून दूर असली तरी अलीकडे एका खास मुलाखतीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
अभिजात मराठी ओटीटी’ला दिलेल्या मुलाखतीत Danashree Kadgaonkar हिला विचारण्यात आलं की, “तुम्ही मालिकांमध्ये वारंवार विग वापरता का?” यावर तीने दिलेलं उत्तर तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धनश्री हसत म्हणाली, “लोकांना वाटतं मी विग लावते, पण खरं सांगायचं झालं तर माझे नैसर्गिक केसच इतके जाड आणि लांब आहेत. माझ्या आईचेही अतिशय दाट, सुंदर केस होते आणि तेच गुण माझ्यात आले आहेत. त्यामुळे हेअर ड्रेसरला माझे केस सेट करताना एक-दोन तास लागतात. त्यांनाही कधी कधी त्रास होतो!”
पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी कधीच विग लावत नाही. हे सगळं चुकीचं ऐकलं गेलं आहे. माझे केस नैसर्गिक आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे. मागील अकरा-बारा वर्षांपासून मी सतत केसांचं स्टाईलिंग करते आहे, पण तरीही माझे केस मजबूत राहिले आहेत. यात मी खूप नशीबवान आहे असं मला वाटतं.”
केसांची निगा राखण्यासाठी ती कोणते उपाय करते, याबद्दल धनश्रीने खुलासा करत सांगितलं, “मी आता केसांना तेल लावणं जवळपास बंद केलं आहे. पण माझ्या आहारात प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश आहे. यामुळे केसांचं आरोग्य टिकून राहतं. कधी कधी व्यायाम आणि जिम केल्यावरही फरक जाणवतो. मधल्या काळात काही ट्रीटमेंट्समुळे केस गळायला लागले होते, पण आता सगळं नॉर्मल आहे.”
हे पण वाचा.. 7 वर्षांच्या प्रेमानंतर ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्याने सांगितली संपूर्ण लव्ह स्टोरी
या candid गप्पांमधून Danashree Kadgaonkar ने चाहत्यांना तिच्या नैसर्गिक सौंदर्याचं खरं रहस्य सांगितलं आहे. तिचं साधेपण आणि आत्मविश्वास पाहून पुन्हा एकदा प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले आहेत. तिचं हे स्पष्ट बोलणं सध्या सोशल मीडियावरही चर्चेचं केंद्र ठरतं आहे.
हे पण वाचा.. मंजिरी ओक यांची १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण; सोमनाथ दर्शनानंतर भावनिक अनुभव केला शेअर







