ADVERTISEMENT

“कॉन्स्टेबल मंजू” आता होणार “इन्स्पेक्टर”; प्रेक्षकांसमोर नवा प्रवास

constable manju navin pravas inspector : "कॉन्स्टेबल मंजू" मालिकेचा नवा अध्याय प्रेक्षकांसमोर येतो आहे. २९ सप्टेंबरपासून मंजू इन्स्पेक्टरच्या भूमिकेत नवा प्रवास सुरू करणार असून तिचा डॅशिंग लूक आणि धाडसी रूप प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.
constable manju navin pravas inspector

constable manju navin pravas inspector : मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांची मने जिंकणारी मालिका “Constable Manju” आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पोलिस वर्दीतील मंजूच्या संघर्षमय प्रवासाला मिळालेलं प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आता अधिक रंगतदार पद्धतीने पाहायला मिळणार आहे. येत्या २९ सप्टेंबरपासून ‘कॉन्स्टेबल मंजू’चा ‘इन्स्पेक्टर मंजू’ म्हणून नवा प्रवास दररोज रात्री ८ वाजता ‘सन मराठी’वर सुरू होणार आहे.

प्रेक्षकांनी या मालिकेला कुटुंबाचा सदस्य समजून दिलेलं प्रेम इतकं खास आहे की, वयाच्या ८४ व्या वर्षी एक आजोबा खास मंजूला भेटण्यासाठी थेट सेटवर हजर झाले होते. सत्य आणि मंजूचं नातं लोकांना इतकं भावतंय की, ते त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मालिकेचा प्रोमो या उत्सुकतेला आणखी उंचीवर घेऊन गेला आहे.

या प्रोमोमध्ये मंजू आता इन्स्पेक्टरच्या रूपात एंट्री घेताना दिसते. तिचा दमदार, डॅशिंग अंदाज आणि अॅक्शनचा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. सत्याचाही बदलेला लूक चर्चेचा विषय ठरत आहे. या दरम्यान त्यांच्या नात्यात काय बदल झाले? कोणत्या नव्या आव्हानांना ते सामोरे जाणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

अभिनेत्री मोनिका राठी, जी मंजूची भूमिका साकारते, तिनं या नव्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं, “‘Constable Manju’ या व्यक्तिरेखेने मला प्रचंड ओळख दिली. प्रेक्षकांचं हे प्रेम माझ्यासाठी फार मोठं बक्षीस आहे. आता मंजू इन्स्पेक्टर म्हणून परतते आहे. तिचा आत्मविश्वास, तिचं धाडस आणि न्यायासाठीची लढाई प्रेक्षकांना अभिमानास्पद वाटेल. या नव्या प्रवासासाठी मी पूर्णपणे तयार आहे आणि अॅक्शन, स्टंट्ससह आणखी ताकदीने प्रेक्षकांसमोर येणार आहे.”

हे पण वाचा.. अर्जुन महिपतच्या ट्रॅप मध्ये प्रिया फसणार, प्रियाच्या खऱ्या आई-बाबांचा मिळाला पत्ता Tharala Tar Mag 28 September

मालिकेतून मंजूचा हा बदल प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. साध्या कॉन्स्टेबलपासून इन्स्पेक्टरपर्यंतचा प्रवास म्हणजे मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं प्रतिक आहे. “Constable Manju” च्या या नव्या अध्यायाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्याची खात्री आहे.

हे पण वाचा.. “मराठमोळा अंदाज! अश्विनी महांगडे हिने साकारला अभिनेत्री रंजनाचा क्लासिक लूक”

constable manju navin pravas inspector