ADVERTISEMENT

TRP साठी ‘Colors Marathi’चा नवा डाव! महाराष्ट्राची स्टार जोडी एकत्र स्क्रीनवर, चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

colors marathi new jodi trp update : कलर्स मराठी वाहिनी TRP वाढवण्यासाठी मोठी तयारी करत असून प्रथमच महाराष्ट्राची प्रिय जोडी छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी कर्मेंट्समध्ये नावांची सरबत्ती लावली आहे आणि आता अधिकृत घोषणा कोणती येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
colors marathi new jodi trp update

colors marathi new jodi trp update : मराठी टेलिव्हिजनवर TRP ची स्पर्धा दिवसेंदिवस रंगत चालली आहे. प्रेक्षकांना रोखून ठेवण्यासाठी आणि दर आठवड्याला TRP चार्टवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी प्रत्येक वाहिनी नवनवीन प्रयोग करत आहे. त्यात Colors Marathi वाहिनीने पुन्हा एकदा मोठं पाऊल उचललं आहे. मागील काही काळापासून या वाहिनीच्या TRP मध्ये घट दिसत असल्याने आता प्रेक्षकांना पुन्हा जोडून ठेवण्यासाठी वाहिनीकडून जलद हालचाली सुरू आहेत.

अलीकडेच Colors Marathi वर ‘बाईपण जिंदाबाद!’ ही नवी संकल्पना साप्ताहिक स्वरूपात सुरू झाली आणि प्रेक्षकांनी तिला चांगला प्रतिसाद दिला. रविवारी रात्री प्रसारित होणारा हा कार्यक्रम घराघरात पोहोचत असून कथा मांडण्याची पद्धत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या यशानंतर आता वाहिनी आणखी एक आकर्षक सरप्राईजसह सज्ज आहे.

Colors Marathi च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये एका खास सेलिब्रिटी कपलचे सिल्हूट दाखवण्यात आले असून त्यांच्या चेहऱ्यांचा खुलासा अद्याप केलेला नाही. “महाराष्ट्राची ही आवडती जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र येणार” असे कॅप्शन देत चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवण्यात आली आहे.

या पोस्टवर चाहत्यांनी अक्षरश: कर्मेंट्सचा वर्षाव सुरू केला. “आशोक मामा आणि निवेदिता मॅडमच असणार”, “मिस्टर अँड मिसेस सराफ परत येणार?”, “आता Colors Marathi वर नवा शो सुरू होत आहे का?” अशा उत्सुकतादर्शक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. काहींनी तर “आमचे मामा-मामी परत येणार” असे प्रेमळ कमेंट्स लिहून सपोर्ट दिला आहे.

या अंदाजांना खऱ्या अर्थाने कितपत आधार आहे याविषयी अद्याप वाहिनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, चर्चा अशी आहे की ही सुपरहिट जोडी नवीन मालिकेत झळकणार की लोकप्रिय शो ‘अशोक मां.मा.’ मध्ये नवीन ट्विस्टसह एकत्र दिसणार, याची माहिती लवकरच समोर येईल.

हे पण वाचा.. लक्ष्मी निवास मध्ये भावनिक ट्विस्ट; जान्हवी-भावना समोरासमोर येणार? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

Colors Marathi ला पुन्हा TRP शर्यतीत मजबूत स्थान मिळवण्यासाठी हा मोठा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता एक मात्र स्पष्ट—महाराष्ट्रातील प्रेक्षक या सरप्राईजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे पण वाचा.. लाडक्या दादूसचा खास क्षण! अरुण कदम यांनी घरच्यांसोबत साजरा केला ६० वा वाढदिवस; नातवाच्या अनोख्या गिफ्टने भारावले

colors marathi new jodi trp update