colors marathi big boss season 6 hint video : मराठी मनोरंजनविश्वात पुन्हा एकदा उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे ‘कलर्स मराठी’ (Colors Marathi) ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेला एक रहस्यमय व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येणार असल्याचा उल्लेख आहे आणि हा छोटेखानी टीझर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये अंदाजांचा पूर आला आहे.
सध्या हिंदी ‘बिग बॉस १९’ अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. अशा वेळी ‘कलर्स मराठी’चा हा नवीन व्हिडीओ पाहून अनेकांनी तर्क लावायला सुरुवात केली आहे की, मराठी ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वाची घोषणा आता कधीही होऊ शकते.
मराठी ‘बिग बॉस’चे पाचही सीझन प्रेक्षकांनी डोळसपणे पाहिले आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुखने होस्टिंगची जबाबदारी घेतली होती, तर सूरज चव्हाण सीझन ५चा विजेता ठरला होता. या दोघांची कामगिरी आणि शोतील वातावरण पाहता, यंदाही तेच चेहरे या मंचावर दिसतील का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
‘कलर्स मराठी’ने पोस्ट केलेल्या टीझरवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे. कोणीतरी थेट “बिग बॉस मराठी सीझन ६ येणार का?” असा सवाल केला तर काहींनी “फायनली बिग बॉस!” असे उद्गार काढले. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता, या रहस्यमय घोषणेमागे ‘बिग बॉस मराठी ६’ची छाया असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
गेल्या सीझनमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकप्रिय कलाकार, इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले होते. शेवटी अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप २मध्ये पोहचले आणि विजयाचा ताज सूरजच्या डोक्यावर चढला. त्यामुळे जर नवा सीझन सुरू होत असेल तर त्यात कोणते कलाकार दिसतील आणि पुन्हा रितेश देशमुखच शो होस्ट करणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा.. येड लागलं प्रेमाचं मालिकेत बिबट्याची एंट्री; नव्या प्रोमोवर प्रेक्षकांची जोरदार चर्चा
आता तर प्रश्न फक्त एकच — ‘कलर्स मराठी’ उद्या कोणता मोठा धमाका करणार? हा व्हिडीओ नक्कीच ‘बिग बॉस मराठी ६’शी संबंधित आहे का, की अजून कुठल्यातरी नव्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे? याचे उत्तर काहीच तासांत मिळणार आहे. प्रेक्षक मात्र उत्सुकतेने उद्याची संध्याकाळ वाट पाहत आहेत.
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली मालिकेत नवा कलाटणीचा इशारा; सावलीच्या आवाजाचं गुपित उघड होणार?







