शेअर बाजारात ‘cochin shipyard share’चा जलद झेपावणारा प्रवास, केवळ दोन वर्षांत 700% पेक्षा अधिक परतावा; गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण
Table of Contents
मुंबई : संरक्षण व नौदल क्षेत्रातील अग्रगण्य सार्वजनिक कंपनी असलेल्या कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये बुधवारी प्रचंड तेजी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजारात या शेअरने दिवसाच्या सुरुवातीला तब्बल 7% वाढ दर्शवली आणि एका क्षणी त्याची किंमत 2,175 रुपयांवर पोहोचली. दुपारपर्यंत काही नफा-वसुलीच्या पार्श्वभूमीवर किंमतीत थोडी घसरण झाली असली, तरीही cochin shipyard share सत्राच्या मध्यावर 3% च्या मजबुतीसह 2,096 रुपयांवर व्यवहार करत होता.
ही उसळी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नाही, तर गेल्या काही वर्षांतील कामगिरी पाहता cochin shipyard share खऱ्या अर्थाने मल्टिबॅगर ठरला आहे. गेल्या दोन वर्षांत या शेअरने 737% परतावा दिला आहे, तर तीन वर्षांत 1,178% आणि पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल 1,649% परतावा देत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.
सध्या कंपनीचं बाजार भांडवल 55,272 कोटी रुपयांच्या घरात आहे. या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संरक्षण क्षेत्रात सरकारच्या वाढत्या गुंतवणुकीमुळे ही कंपनी भविष्यातही तेजीचे केंद्र ठरू शकते.
cochin shipyard share होल्डिंग पॅटर्न आणि आर्थिक निकाल
31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस cochin shipyard share संदर्भात शेअरहोल्डिंगमध्ये सरकारचा (प्रमोटर) हिस्सा 67.9% असून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे 2.9%, म्युच्युअल फंडांकडे 3.4% तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे 22.4% हिस्सेदारी आहे.
कंपनीच्या आर्थिक निकालाकडे पाहिल्यास, 2025 च्या चौथ्या तिमाहीत कोचीन शिपयार्डने 10.8% वार्षिक वृद्धीसह 287 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. या तिमाहीत महसूलही 37% वाढून 1,758 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे आकडे स्पष्टपणे सूचित करतात की कंपनी केवळ शेअर बाजारातच नव्हे, तर व्यवसायिक स्तरावरही मजबूत स्थितीत आहे.
हे पण वाचा..eternal share price मध्ये जोरदार उसळी; 5% पर्यंतची वाढ, गुंतवणूक करावी का?
तांत्रिक विश्लेषण आणि शेअरचे मूळ मूल्य
सध्या cochin shipyard share बाजारातील सर्व प्रमुख मूव्हिंग अॅव्हरेज (SMA) च्या वर व्यवहार करत आहे. हे 5, 10, 20, 50, 100, 150 आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतींपेक्षा वरच्या पातळीवर आहे, ज्यामुळे तेजीचा कल अजूनही मजबूत आहे.
तसेच, Relative Strength Index (RSI) हा 68 पातळीवर असून, तो 70 च्या ‘ओव्हरबॉट‘ मर्यादेच्या जवळ पोहोचत आहे, त्यामुळे तात्पुरती घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. MACD देखील सकारात्मक झोनमध्ये असून तेजीचे संकेत देत आहे.
तथापि, ट्रेंडलायनच्या विश्लेषणानुसार, या शेअरचा सरासरी लक्ष्य मूल्य (target price) सध्या 1,349 रुपये इतका असून, सध्याच्या दरांपेक्षा 36% घसरण सुचवतो. तीन विश्लेषकांनी या शेअरवर ‘Hold’ म्हणजेच सध्याची स्थिती कायम राखा, असा सल्ला दिला आहे.
संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रातील तेजीचा परिणाम
मार्च 2025 मध्ये आलेल्या घसरणीनंतर, NSE 500 निर्देशांकाच्या बाजार भांडवलात मे 2025 पर्यंत 15% वाढ झाली आहे. यात विदेशी गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या महिन्यात सकारात्मक सहभाग नोंदवला आहे. मे महिन्यात विदेशी गुंतवणूक 1.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 7.9 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली.
विशेष म्हणजे, या वाढीचा केंद्रबिंदू संरक्षण, भांडवली वस्तू, पायाभूत सुविधा आणि रेल्वे क्षेत्रात होता. यामध्ये डिफेन्स आणि रेल्वे शेअर्सचे बाजार भांडवल गेल्या दोन महिन्यांत विक्रमी स्तरावर पोहोचले असून, FY19 ते मे 2025 दरम्यान अनुक्रमे 55% आणि 46% चा CAGR नोंदवला आहे.
हे पण वाचा ..ट्रेंडमध्ये ‘fund kaveri engine’ का आहे? स्वदेशी तंत्रज्ञानासाठी जनतेचा सरकारला संदेश!
नजीकच्या काळात काय अपेक्षित?
भारताच्या संरक्षण धोरणांमध्ये बदल आणि स्वदेशी उत्पादनाला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे कोचीन शिपयार्ड शेअर आणखी मजबूत स्थितीत राहू शकतो. अलीकडे ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर संपूर्ण संरक्षण क्षेत्राला मोठा बूस्ट मिळाला आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारची संरक्षण व्यय वाढवण्याची तयारी, प्रादेशिक संघर्षांचे वाढते स्वरूप आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची मागणी या सर्व गोष्टी या कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घकालीन तेजीचं कारण ठरू शकतात.
सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी cochin shipyard share हा सध्याच्या बाजारात एक आकर्षक पर्याय बनला आहे. मात्र सध्याची किंमत लक्षात घेता, शहाणपणाने गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरते. शेअरमध्ये तात्पुरती घसरण होण्याची शक्यता असली तरी दीर्घकालीन दृश्टिकोनातून पाहता, हा शेअर अजूनही मजबूत पाया असलेला आहे. गेल्या दोन वर्षांत दिलेला 700% पेक्षा अधिक परतावा याचे स्पष्ट उदाहरण आहे.
गुंतवणुकीचा निर्णय घेताना, कंपनीची मूलभूत स्थिती, आर्थिक कामगिरी आणि धोरणात्मक दिशा यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. तरीही, संरक्षण क्षेत्रातील हा मजबूत खेळाडू गुंतवणूकदारांसाठी आगामी काळातही फायदेशीर ठरू शकतो.