chhaya kadam saterichi jatra video kokan : कोकणाचं निसर्गमय सौंदर्य, शांत वातावरण आणि गावाकडची मनाला भिडणारी ऊब—हीच जागा अनेकांच्या भावना घट्ट बांधून ठेवते. प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्यासाठीही कोकण म्हणजे फक्त मूळ गाव नव्हे, तर मनाचं घर. म्हणूनच जरा वेळ मिळाल्यावर त्या थेट कोकणातील धामापूर आणि आसपासच्या भागात पळ काढतात. नुकतेच त्यांनी सरंबळ येथे भरलेल्या सातेरी देवीच्या जत्रेला उपस्थित राहून हा धागा पुन्हा एकदा घट्ट केला.
छाया कदम यांनी आपल्या सोशल मीडियावर या जत्रेतले काही निवडक क्षण शेअर केले असून, हे व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. देवीच्या पालखीचा शुभप्रसंग, गावकऱ्यांची गर्दी आणि लोककलेचा आनंद असा या जत्रेचा सुरेख मिलाफ त्यांच्या कॅमेऱ्यातून दिसून येतो. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर जाऊन साधेपणाचा अवलंब करणाऱ्या छाया कदम या जत्रेत गावकऱ्यांसोबत चालताना दिसतात. कोणताही तामझाम नाही, खास व्यवस्था नाही—फक्त आपुलकीने भरलेले क्षण. अभिनेत्रीच्या या साधेपणावर चाहत्यांनी कमेंट्समधून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
जत्रेतील एक खास क्षण म्हणजे ‘दशावतार’ हा कोकणाचा पारंपरिक लोककलाप्रकार. छाया कदम या ही कला पाहण्यात इतक्या रमल्या की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट जाणवत होता. या प्रकारावरील त्यांचा प्रेमळ दृष्टिकोन अनेकांच्या मनाला भावला आहे.
फँड्री, सैराट, सरला एक कोटी, झुंड, लापता लेडीज, मडगाव एक्स्प्रेस आणि गंगूबाई काठियावाडी अशा नावलौकिक मिळवलेल्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्यानंतरही छाया कदम गावाशी असलेली नाळ विसरलेल्या नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही साधेपणाची बाजूच त्यांना चाहत्यांच्या अधिक जवळ नेते.
व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलेलं छोटंसं कॅप्शन— “सरंबळच्या सातेरीची जत्रा, देवीची पालखी, मामा मोचेमाडकरांचो दशावतार, गाव आणि मी”—यातून त्यांच्या भावना स्पष्ट उमटतात. सोशल मीडियावर हे क्षण पाहताच चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आणि या ओढीचं कौतुक केलं.
हे पण वाचा.. घराला आग लागली तेव्हा थोडक्यात बचावला शिव ठाकरे, काय घडलं सांगत म्हणाला..
छाया कदम यांचा हा व्हिडीओ केवळ जत्रेचे दर्शन घडवत नाही, तर गावाशी जोडलेपण कसं जपावं, याचाही सुंदर संदेश देऊन जातो.
हे पण वाचा.. उषा नाडकर्णी घरात नवऱ्याचा फोटो नसल्यावरून उठलेल्या चर्चेला उषा नाडकर्णींची ठाम प्रतिक्रिया









