Bigg Boss Updates rakesh bapat rakhi sawant figh : नुकत्याच समोर आलेल्या एपिसोडमध्ये राकेश बापट आणि राखी सावंत यांच्यातील वाद थेट वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचे दिसले. आधीच विशालसोबत झालेल्या वादानंतर राकेश मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं, आणि त्यातच राखीचं नाव पुढे आल्यानं परिस्थिती अधिकच बिघडली.
तर झालं अस की, राखी बेडरूममध्ये मेकअप करत असताना राकेश तिच्यापाशी जातो आणि विचारतो, “राखी तू अनुश्री, विशाल आणि सागर यांना सांगितलं का की बिग बॉसने मला ओढून-तोडून आणलंय?”
यावर राखी म्हणते, “तू काल सांगितलंस ना की बिग बॉसने मला ओढून-तोडून आणलंय… तू हे पण बोलला की मला यायचं नव्हतं, बिग बॉसने मला आणलंय.”
हे ऐकताच राकेश संतापतो आणि म्हणतो, “इकडची गोष्ट तिकडं करू नकोस… बस झाली तुझी नाटक!”
राखी पुन्हा म्हणते, “त्या लोकांनी मला कसं आणलंय, मला घेऊन आलेत जबरदस्ती…”
यावर राकेश संतापून म्हणतो, “बिग बॉस मला कन्फेशन रूममध्ये बोलवा… आताच्या आता!” असं म्हणत तो माईक फेकून देतो.
यानंतर तो राखीला म्हणतो, “तुला गरज आहे का राखी चोमडेगिरी करायची?” आणि तिच्या अंगावर धावून जातो.
राकेश म्हणतो, “मी असं काहीच बोललो नाही,” तर राखी त्याला उत्तर देते, “रेकॉर्डिंग आहे बिग बॉसकडे !”
राकेश पुन्हा हातवारे करत म्हणतो, “नाटक बस कर… बस झालं आता!”
दोघांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरूच राहतं. राकेश तिला “फालतू”, “बिनडोक” म्हणतो.
हे ऐकून राखी म्हणते, “तू बिनडोक… तू फालतू… मुलीच्या पाठी पाठी पळतो… मुलींना हत्यार बनवतोस!”
हे ऐकताच राकेशचा पारा चढतो आणि तो पुन्हा राखीच्या अंगावर धावून जातो. घरातील सदस्य वाद थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण दोघेही थांबत नाहीत.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 मध्ये नॉमिनेशनवरून घरात रंगला वाद, तन्वीच्या निर्णयावर अनुश्री भडकली!
Bigg Boss Updates rakesh bapat rakhi sawant figh
शेवटी बिग बॉसला मध्यस्थी करावी लागते. बिग बॉस म्हणतात, “राखी आणि राकेश बाजूला व्हा…” पण तेही ऐकत नाहीत. राखीही सतत त्याला उचकावत असल्याचं चित्र दिसतं.
राकेश बापट राखी सावंतच्या वादामुळे घरात तणाव निर्माण झाला आहे. काही सदस्य वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही जण दूर राहून परिस्थिती पाहत आहेत. पुढे हा वाद कुठपर्यंत जाईल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे
हे पण वाचा.. विशाल कोटियन कडून मर्यादा ओलांडल्या? “राकेश बापट”च्या कुटुंबीयांचा संताप, “रितेश देशमुख” यांच्याकडे न्यायाची मागणी









