ADVERTISEMENT

पहिल्याच दिवशी वादाचा भडका! बिग बॉस मराठी सीझन ६ च्या प्रोमोमध्ये तन्वी-रुचिता आमनेसामने

bigg boss marathi season 6 new promo conflict : बिग बॉस मराठी सीझन ६ चा नवा प्रोमो समोर आला असून पहिल्याच दिवशी घरात तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात जोरदार वाद रंगताना दिसत आहे.
bigg boss marathi season 6 new promo conflict

bigg boss marathi season 6 new promo conflict : प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा Bigg Boss Marathi season 6 अखेर ११ जानेवारी २०२६ पासून सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बॉसच्या घरात काय घडणार, कोण कोणाशी मैत्री करणार आणि कोणामध्ये वाद निर्माण होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सहाव्या सीझनमध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले असून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या या कलाकारांमुळे घरातील वातावरण पहिल्याच दिवसापासून तापलेलं दिसत आहे.

दरम्यान, Bigg Boss Marathi season 6 चा एक धमाकेदार प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये घरातील पहिल्या मोठ्या वादाची झलक पाहायला मिळते. या प्रोमोमध्ये करण सोनवणे आणि रुचिता जामदार यांच्यात हलकंफुलकं बोलणं सुरू असतं. करण स्विमिंग पूलचा संदर्भ देत थोडी गंमत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावर रुचिता हसताना दिसते.

मात्र, हेच संभाषण पुढे वादाचं कारण ठरतं. तन्वी कोलते तिथे येत करणला फालतू बोलू नकोस, असं बजावते. त्यावर रुचिता तिखट शब्दांत प्रतिक्रिया देते. “तुम्ही कायम कुणी काय बोलतंय यावर शस्त्र घेऊन तयार असता,” असं रुचिता म्हणताच वातावरण चांगलंच तापतं. यानंतर तन्वी आणि रुचिता यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगते. एकमेकींवर मर्यादा ओलांडल्याचे आरोप करत दोघीही आक्रमक होताना दिसतात. इतकंच नाही तर वापरलेले शब्द पाहता हा वाद पुढे आणखी वाढणार असल्याची चिन्हं आहेत.

पहिल्याच दिवशी घरात एवढा मोठा वाद पाहून इतर स्पर्धकही मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना प्रोमोमध्ये दिसतात. कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर करताना “पहिल्याच दिवशी रंगणार तन्वी आणि रुचिता यांच्यात वाद” अशी कॅप्शन दिली असून चाहत्यांमध्ये या सीझनबाबत अधिकच उत्सुकता वाढली आहे.

या सीझनमध्ये तन्वी कोलते, रुचिता जामदार, करण सोनवणे यांच्यासह राकेश बापट, दिव्या शिंदे, राधा पाटील, विशाल कोटियन, सागर कारंडे, दिपाली सय्यद, सोनाली राऊत यांसारखे अनेक ओळखीचे चेहरे सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे Bigg Boss Marathi season 6 चे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करत असून त्यांच्या शैलीमुळे शोला वेगळीच रंगत येताना दिसत आहे.

हे पण वाचा.. खान्देशचा आवाज ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये – युट्युब स्टार सचिन कुमावतची दमदार एन्ट्री

एकंदरीत, पहिल्याच प्रोमोने हे स्पष्ट केलं आहे की यंदाचा सीझन वाद, ड्रामा आणि मनोरंजनाने भरलेला असणार आहे. पुढील दिवसांत घरात कोणते नवे समीकरण तयार होतात, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

हे पण वाचा.. रसिका वखारकरचा लग्न काउंटडाऊन सुरू; ‘10 Days To Go’ व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता

bigg boss marathi season 6 new promo conflict