ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 : ‘मुलीच सीझन गाजवणार’, उत्कर्ष शिंदेंची पुरुष स्पर्धकांवर जोरदार टीका

bigg boss marathi 6 utkarsh shinde post : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्याच आठवड्यात घरातील खेळ रंगात आला असून, अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावरून पुरुष स्पर्धकांच्या निष्क्रिय खेळावर परखड मत व्यक्त केलं आहे.
bigg boss marathi 6 utkarsh shinde post

bigg boss marathi 6 utkarsh shinde post : बिग बॉस मराठी ६आता प्रेक्षकांच्या नजरेत भरू लागला आहे. पहिल्या आठवड्यातच घरातील नॉमिनेशन टास्क पार पडला असून, कोणता स्पर्धक खेळात पुढे जाणार आणि कोण मागे पडणार याचा अंदाज प्रेक्षकांना येऊ लागला आहे. अशातच या सीझनबाबत अभिनेता उत्कर्ष शिंदेने केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

उत्कर्ष शिंदेने याआधी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. आपल्या स्पष्ट विचारसरणीमुळे आणि आक्रमक खेळामुळे तो थेट महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे हा खेळ कसा खेळायचा, घरात कसं वावरायचं याचा अनुभव त्याला चांगलाच आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेला उत्कर्ष अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवरही आपलं ठाम मत मांडत असतो. त्यामुळे Bigg Boss Marathi 6 बाबत त्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहे.

या सीझनच्या सुरुवातीपासूनच काही महिला स्पर्धक घरात प्रभावीपणे गेम खेळताना दिसत आहेत. सोनाली राऊत, तन्वी कोलते, दिपाली सय्यद आणि राधा पाटील ही नावं पहिल्याच आठवड्यात चर्चेत आली आहेत. त्याउलट पुरुष स्पर्धकांमध्ये फारशी आक्रमकता किंवा ठोस भूमिका दिसत नसल्याचं अनेक प्रेक्षकांचं मत आहे. करण सोनावणे सोडला तर इतर पुरुष स्पर्धक अजूनही फ्रंटफुटवर खेळताना दिसत नाहीत.

याच मुद्द्यावर बोट ठेवत उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “हा सीझन फक्त आणि फक्त मुली हिट करतील. घरातील मुलांनो, तुम्ही जर असंच निष्क्रिय राहणार असाल तर बाहेर या… तुमची जिमची मेंबरशिप तरी वाया जाणार नाही,” असा टोला त्याने लगावला आहे. सोनाली राऊत आणि तन्वी कोलते यांचा फोटो शेअर करत सध्या घरात मुलीच जास्त प्रभावी खेळ करत असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

दरम्यान, Bigg Boss Marathi 6 च्या पहिल्या आठवड्यात तब्बल नऊ सदस्य नॉमिनेशनच्या यादीत आले आहेत. प्रभू शेळके, दिपाली सय्यद, करण सोनावणे, दिव्या शिंदे, सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील आणि रुचिता जामदार यांचा त्यात समावेश आहे. यापैकी कोणाचा प्रवास पुढे सुरू राहणार आणि कोणाला घराबाहेर जावं लागणार, हे येत्या वीकेंडला स्पष्ट होणार आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान गोंधळ, विशाल-ओमकारमध्ये जोरदार भिडंत

एकूणच, Bigg Boss Marathi 6 च्या सुरुवातीच्या टप्प्यातच घरातील समीकरणं बदलताना दिसत असून, उत्कर्ष शिंदेच्या वक्तव्यामुळे हा विषय आणखी तापण्याची चिन्हं आहेत. आता पुरुष स्पर्धक खरंच गेममध्ये आक्रमक होणार का, की महिलांचाच दबदबा कायम राहणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

हे पण वाचा.. Tharala Tar Mag 15 January Episode Update: अर्जुन जखमी, प्रियाची उडाली झोप; महिपत पोलिसांच्या ताब्यात

bigg boss marathi 6 utkarsh shinde post