ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 मध्ये नवा धमाका, ‘उल्टा पुल्टा’ खोलीतून बदलणार संपूर्ण गेम

bigg boss marathi 6 ulta pulta kholi twist : बिग बॉस मराठी ६ च्या दुसऱ्या आठवड्यात घरात उघडणार कधीही न पाहिलेली ‘उल्टा पुल्टा’ खोली. पहिली कॅप्टन प्राजक्ताच्या निर्णयावर संपूर्ण गेमचं भविष्य अवलंबून.
bigg boss marathi 6 ulta pulta kholi twist

bigg boss marathi 6 ulta pulta kholi twist : ‘बिग बॉस मराठी ६’ च्या सहाव्या पर्वाने सुरुवातीलाच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच पहिला ‘भाऊचा धक्का’ पार पडला आणि या एपिसोडमध्ये होस्ट रितेश देशमुखने घरातील अनेक स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली. पहिला आठवडा असल्याने कोणालाही घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला नाही. नऊ स्पर्धक नॉमिनेट असले तरी, त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे. त्यामुळेच हेच नऊ स्पर्धक दुसऱ्या आठवड्यातही नॉमिनेशनमध्ये कायम राहणार असल्याचं रितेशने स्पष्ट केलं.

पहिल्या आठवड्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात काय नवं घडणार, याकडे Bigg Boss Marathi 6 चे चाहते उत्सुकतेने पाहत होते. नुकताच समोर आलेला नवा प्रोमो पाहता, यंदा बिग बॉसने असा ट्विस्ट आणला आहे जो याआधी कधीच पाहायला मिळालेला नाही. यंदाच्या घराची संकल्पनाच वेगळी असून ‘८०० खिडक्या आणि ९०० दारं’ ही थीम स्पर्धकांसाठी अनेक अनपेक्षित घडामोडी घेऊन येणार असल्याचं संकेत मिळत आहेत.

या पर्वात पहिल्यांदाच बिग बॉस घरातील एक खास खोली उघडणार आहेत, जी याआधीच्या कोणत्याही सीझनमध्ये नव्हती. या खोलीचं नाव आहे ‘उल्टा पुल्टा’ रूम. नावाप्रमाणेच या खोलीतील प्रत्येक गोष्ट उलट्या पद्धतीने ठेवलेली आहे. खोलीची पहिली झलक समोर येताच स्पर्धकच नव्हे, तर प्रेक्षकही चक्रावून गेले आहेत. या विचित्र पण रंजक खोलीत सर्वात आधी प्रवेश करणार आहे घराची पहिली कॅप्टन प्राजक्ता.

या खोलीचं महत्त्व सांगताना बिग बॉस प्राजक्ताला स्पष्ट शब्दांत सूचित करतात की, या रूममध्ये संपूर्ण खेळाची दिशा बदलण्याची ताकद आहे. “ही खोली अख्खा गेम उलटा पुलटा करू शकते, तू काय निवडणार?” असा थेट प्रश्न बिग बॉस तिच्यासमोर ठेवतात. त्यामुळे कॅप्टन म्हणून तिला मिळणारी पॉवर नेमकी काय असणार, आणि ती त्याचा कसा वापर करणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या ट्विस्टमुळे रुचिता जामदार विशेष आनंदात असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही ‘उल्टा पुल्टा’ खोली एखाद्या महत्त्वाच्या पॉवर कीशी संबंधित असावी, असा अंदाजही प्रेक्षक व्यक्त करत आहेत. आता या खोलीत नेमकं काय घडणार, कोणाचा फायदा होणार आणि कोण अडचणीत येणार, याचा उलगडा आजच्या भागात होणार आहे.

हे पण वाचा.. लागिरं झालं जी’मधील शितली आजही प्रेक्षकांच्या लक्षात, जाणून घ्या शिवानी बावकर बद्दल

Bigg Boss Marathi 6 सध्या चांगलाच रंगात आला असून हा शो कलर्स मराठी वाहिनीवर दररोज रात्री ८ वाजता प्रसारित केला जातो. पुढील आठवड्यातील हा अनोखा ट्विस्ट प्रेक्षकांचा मनोरंजनाचा डोस नक्कीच वाढवणार आहे.

हे पण वाचा.. क्रांती रेडकरची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; नवऱ्यासाठी लिहिले प्रेमळ शब्द म्हणाली..

bigg boss marathi 6 ulta pulta kholi twist