ADVERTISEMENT

लाडका भाऊ योजना सुरू? रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावर दिव्या शिंदेला दाखवला आरसा

bigg boss marathi 6 ritesh deshmukh bhaucha dhakka divya shinde : बिग बॉस मराठी ६ च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी दिव्या शिंदेच्या गेमवर स्पष्ट भाष्य केलं. ‘लाडका भाऊ योजना’ म्हणत सुनावल्याने हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
bigg boss marathi 6 ritesh deshmukh bhaucha dhakka divya shinde

bigg boss marathi 6 ritesh deshmukh bhaucha dhakka divya shinde : बिग बॉस मराठी ६ मधील वीकेंड एपिसोड म्हणजेच ‘भाऊचा धक्का’ हा प्रेक्षकांसाठी नेहमीच खास ठरतो. याच मंचावर सूत्रसंचालक Ritesh Deshmukh घरातील सदस्यांच्या खेळाचं बारकाईने निरीक्षण करत, योग्य ठिकाणी थेट प्रश्न विचारतात. यावेळीही असाच एक क्षण पाहायला मिळाला, ज्यामध्ये Ritesh Deshmukh यांनी दिव्या शिंदेच्या गेमवर उघडपणे नाराजी व्यक्त केली.

घरात काही सदस्य आक्रमक पद्धतीने फ्रंटफूटवर खेळताना दिसत असताना, काहीजण अजूनही बॅकफूटवर असल्याचं स्पष्ट जाणवत आहे. Ritesh Deshmukh यांनी याच मुद्द्यावरून दिव्या शिंदेला थेट जाब विचारला. बाहेरच्या जगात दिव्याचा मोठा चाहतावर्ग असून तिला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळतो आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात तिचा खेळ अपेक्षेप्रमाणे दिसत नसल्याचं भाऊच्या धक्क्यावर ठळकपणे मांडण्यात आलं.

दिव्या शिंदे घरात स्वतःपेक्षा अधिक राकेश बापटसाठी उभी राहत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. तिने राकेशला भाऊ मानलं असून, प्रत्येक टास्कमध्ये ती त्याचं समर्थन करताना दिसते. नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्येही तिने शेवटपर्यंत राकेशला डिफेंड केलं. परिणामी, घरात एकमत न झाल्यामुळे सर्व सदस्यांना सिल्व्हरऐवजी ब्रॉन्झ रेशन कार्ड स्वीकारावं लागलं. हाच मुद्दा धरून Ritesh Deshmukh यांनी दिव्याला ‘लाडका भाऊ योजना’ असा टोमणा मारला.

भाऊच्या धक्क्यावर Ritesh Deshmukh म्हणाले की, घरात नातेसंबंध दिसत आहेत, पण गेम दिसत नाही. “तुम्ही बाहेर एक लीडर आहात, पण इथे तुम्ही फक्त सपोर्टर म्हणून दिसताय,” अशा शब्दांत त्यांनी दिव्याला तिच्या खेळाचा आरसा दाखवला. राकेशच्या बाजूने कायम उभं राहणं योग्य असलं, तरी स्वतःचा स्वतंत्र गेम न दाखवणं ही मोठी चूक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया झपाट्याने येऊ लागल्या. “Ritesh Deshmukh आले की कोणालाच सुट्टी नाही”, “दिव्या एकटी हा गेम खूप चांगला खेळू शकते”, “आता तरी तिने स्वतःसाठी उभं राहावं” अशा अनेक कमेंट्स व्हायरल होत आहेत. काहींनी तर रितेशने अगदी योग्य वेळी कानउघाडणी केल्याचंही म्हटलं आहे.

हे पण वाचा.. मुलीच्या भवितव्याची काळजी ‘लाईटली’ घ्या” ‘लक्ष्मी निवास’ फेम हर्षदा खानिलकरचा महिलांसाठी खास सल्ला

दरम्यान, या आठवड्यात घरात एकूण आठ सदस्य नॉमिनेट झाले असून, यामध्ये सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रुचिता जामदार यांचा समावेश आहे. यापैकी कोणाचा प्रवास संपणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. एकंदरीतच, Ritesh Deshmukh यांच्या थेट शैलीमुळे Bigg Boss Marathi 6 आणखी रंगतदार होत चाललं आहे.

हे पण वाचा.. कमळीची खरी ओळख उघड! अन्नपूर्णा आजीची नात म्हणून महाजनांच्या घरात होणार दणक्यात एन्ट्री

bigg boss marathi 6 ritesh deshmukh bhaucha dhakka divya shinde