bigg boss marathi 6 riteish deshmukh bhaucha dhakka anushree mane : बिग बॉस मराठी ६ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. घरातील वाढता तणाव, सदस्यांमधील वाद आणि Riteish Deshmukh यांचा थेट हस्तक्षेप यामुळे हा आठवडा अधिकच गाजतो आहे. नुकताच घरात दुसरा ‘भाऊचा धक्का’ पार पडला असून, या धक्क्यात Riteish Deshmukh यांनी अनुश्रीची जाहीरपणे शाळा घेतली आहे. या घटनेचा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दुसऱ्या आठवड्यात राशन टास्कदरम्यान अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यात मोठा वाद झाला होता. या वादाच्या भरात अनुश्रीकडून शिवीगाळ झाली, असा आरोप प्राजक्ताने केला. ही बाब घरातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर दिपाली सय्यद यांनी अनुश्रीला थेट जाब विचारला. मात्र, या वेळी अनुश्रीने केलेलं वक्तव्य अनेकांच्या मनाला लागून गेलं. “आईला घेऊन आली होतीस, आता बाबांना घेऊन ये,” असे शब्द तिने वापरले आणि त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.
याच मुद्द्यावरून Riteish Deshmukh यांनी भाऊच्या धक्क्यात अनुश्रीला समोरासमोर प्रश्न विचारले. “प्राजक्ता जेव्हा दिपालीला घेऊन आली, तेव्हा तुम्ही नेमकं काय बोललात?” असा सवाल त्यांनी केला. अनुश्रीने यावर हसण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचं ते हसणं पाहून Riteish Deshmukh यांचा पारा चढला. त्यांनी तिला स्पष्ट शब्दांत सुनावलं की, बिग बॉसचं घर हे मस्तीचं ठिकाण नसून शिस्त पाळण्याची जागा आहे.
“लक्ष इथे द्या,” असं ठामपणे सांगत Riteish Deshmukh यांनी अनुश्रीला तिच्या शब्दांची जाणीव करून दिली. त्यांच्या या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे घरात शांतता पसरली, तर अनुश्रीचा चेहरा उतरलेला दिसून आला. हा प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी “हेच पाहायचं होतं,” “भाऊचा धक्का एकदम योग्य,” तर काहींनी “Riteish Deshmukh यांनी योग्य वेळी योग्य शब्द वापरले,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हे पण वाचा.. अंकिता वालावलकरचं नवं स्वप्न पूर्ण! कोकण हार्टेड गर्लनं घेतली दुसरी नवीन कार, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान, हा संपूर्ण भाऊचा धक्का प्रेक्षकांना कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे. Bigg Boss Marathi 6 मध्ये पुढे काय घडणार, आणि अनुश्री तिच्या वागणुकीत बदल करणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६ मध्ये भावुक क्षण; राकेश बापटचा बालपणीचा फोटो व्हायरल, बाप्पाशी असलेलं नातं पुन्हा चर्चेत









