ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 : राकेश बापट–अनुश्री माने वादावर सोनाली पाटीलची थेट प्रतिक्रिया

bigg boss marathi 6 rakesh anushree controversy sonali patil reaction : बिग बॉस मराठी ६ च्या घरात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात झालेल्या गंभीर वादानंतर वातावरण तापलं असून, माजी स्पर्धक सोनाली पाटीलने व्हिडीओद्वारे आपलं परखड मत मांडलं आहे.
bigg boss marathi 6 rakesh anushree controversy sonali patil reaction

bigg boss marathi 6 rakesh anushree controversy sonali patil reaction : बिग बॉस मराठी ६ मध्ये नुकताच एक संवेदनशील आणि वादग्रस्त प्रसंग घडला असून, त्याची चर्चा घराबाहेरही रंगू लागली आहे. राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यातील वादामुळे संपूर्ण घरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. एका घटनेनंतर अनुश्रीने “माझा हात परवानगीशिवाय पकडण्यात आला” असा आरोप केल्याने हा मुद्दा अधिकच गंभीर बनला. या आरोपांनंतर रुचिता हिचाही सहभाग असल्याचं पाहायला मिळालं आणि परिस्थिती चिघळली.

या सगळ्या प्रकारामुळे राकेश बापट प्रचंड अस्वस्थ झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. संतापाच्या भरात तो गार्डन एरियात गेला आणि तिथे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. या वादात तन्वी कोलतेने राकेशची बाजू घेत “तो जेंटलमन आहे आणि हा विषय वेगळ्याच दिशेने जातोय” असं मत मांडलं. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

दरम्यान, Bigg Boss Marathi च्या तिसऱ्या सीझनमधील स्पर्धक आणि अभिनेत्री सोनाली पाटील हिने या संपूर्ण प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचं सांगत सोनालीने आजच्या एपिसोडमुळे आपल्याला खूप वाईट वाटल्याचं कबूल केलं. तिच्या मते, संबंधित घटनेच्या वेळी लगेच प्रतिक्रिया न देता दुसऱ्या दिवशी त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर केला गेला, ज्यामुळे वाद अधिक वाढला.

सोनालीने तिच्या सीझनमधील एक अनुभवही सांगितला. “आमच्याही सीझनमध्ये असाच एक गैरसमज निर्माण झाला होता. अनेकदा हेतू चुकीचा नसतो, पण परिस्थितीमुळे आरोप होतात,” असं ती म्हणाली. एखाद्याच्या चारित्र्यावर सहजपणे बोट दाखवणं योग्य नसल्याचं मत तिने ठामपणे मांडलं. घरात सतत कॅमेरे असताना अशा आरोपांचा समोरच्या व्यक्तीवर मानसिक परिणाम होतो, याकडेही तिने लक्ष वेधलं.

तसंच, सोनालीने ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांना विनंती करत म्हटलं की, अशा प्रकारच्या घटना योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या पाहिजेत. Bigg Boss Marathi 6 हा मोठा मंच असून, इथे कोणीही आपली प्रतिमा खराब करण्यासाठी येत नाही, असं तिने स्पष्ट केलं. तिच्या मते, “मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकजण स्वतःचं चारित्र्य जपतो; मात्र काही गैरसमजांमुळे संपूर्ण विषय वेगळ्याच वळणावर जातो.”

हे पण वाचा.. नम्रता सांभेराव चा बहिणीसोबतचा सुरेल गवळणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

या प्रकरणानंतर राकेश बापटचे चाहतेही सोशल मीडियावर आक्रमक झाले असून, अनुश्री आणि रुचिता यांना घराबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. Bigg Boss Marathi 6 मधील हा वाद पुढे कोणत्या दिशेने जाणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे पण वाचा.. एकटं राहणं सोपं नव्हतं – घटस्फोटानंतरचा काळ नंदिता पाटकरने सांगितला”

bigg boss marathi 6 rakesh anushree controversy sonali patil reaction