ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखचा संताप, तन्वी कोलतेची घेतली चांगलीच शाळा

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka tanvi kolte : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखने तन्वी कोलतेच्या वागणुकीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असून हा भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.
bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka tanvi kolte

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka tanvi kolte : स्टार प्रवाहवरील चर्चित रिअ‍ॅलिटी शो Bigg Boss Marathi 6 चा आज पहिला भाऊचा धक्का पार पडणार असून या भागाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. यंदाच्या सीझनची सुरुवातच वादळी झाली असून पहिल्याच आठवड्यात काही स्पर्धकांनी घरात चांगलाच गदारोळ घातला आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे तन्वी कोलते. तिची आक्रमक भाषा, सातत्याने होणारी भांडणं आणि मनासारखं न झालं की रडण्याची सवय यामुळे ती सतत चर्चेचा विषय ठरली आहे.

Bigg Boss Marathi 6 च्या घरात तन्वीचं वागणं केवळ सहस्पर्धकांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठीही आश्चर्यकारक ठरलं. मोठ्यांशी उद्धट बोलणं, क्षुल्लक मुद्द्यांवरून वाद घालणं आणि नंतर भावनिक होऊन स्वतःला पीडित दाखवणं, असा तिचा एकंदर प्रवास पहिल्याच आठवड्यात पाहायला मिळाला. इतकंच नाही तर तिने अभिनेता सागर कारंडेच्या प्रोफेशनवरही केलेलं भाष्य अनेकांना खटकलं. त्यामुळे भाऊचा धक्का या मंचावर रितेश देशमुख तिच्याशी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

अखेर आजच्या भागात तो क्षण येणार आहे. पहिल्याच भाऊचा धक्का देताना रितेश देशमुखने तन्वीच्या गेमप्लॅनवर थेट बोट ठेवलं. “तन्वी कोलते किती बोलते?” असा थेट सवाल करत त्याने तिच्या वागणुकीची कानउघडणी केली. संपूर्ण आठवडा प्रेक्षकांनी ज्या गोष्टींबाबत चर्चा केली, त्याच मुद्द्यांवर रितेशने स्पष्ट मत मांडलं. खूप बोलणं, मग भांडण करणं आणि सगळं झाल्यावर रडणं, हा पॅटर्न त्याने ठळकपणे समोर आणला.

रितेश देशमुख म्हणाला की, तन्वी घरात तंट्यांची राणी बनत चालली आहे. तिच्या जिभेवर कोणताही ब्रेक नसल्याचं तो मिश्कील पण ठाम शब्दांत सांगताना दिसला. दरम्यान, तन्वीने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र “मी बोलतोय, थांबा एक मिनिट,” असं म्हणत रितेशने तिला थेट थांबवलं. हा क्षण पाहून घरातही शांतता पसरली.

हे पण वाचा.. पारू’ मालिकेतील प्रिया म्हणजेच संजना काळेने घेतली नवी कार, सोशल मीडियावर आनंद व्यक्त

या प्रोमोवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक प्रेक्षकांनी रितेशच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं असून “याचीच गरज होती”, “आला रे आला आपला भाऊ आला”, “तन्वी आता तंटा क्वीन झालीये” अशा कमेंट्स व्हायरल होत आहेत. Bigg Boss Marathi 6 चा हा पहिला भाऊचा धक्का नक्कीच सीझनला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे.

हे पण वाचा.. घटस्फोटाची नोटीस, छतावर गेलेली अधिरा आणि मल्लिकाचा डाव; वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट

bigg boss marathi 6 pahila bhaucha dhakka tanvi kolte