ADVERTISEMENT

स्वर्ग-नरक नाही, तर काहीतरीच वेगळं! Bigg Boss Marathi 6 बद्दल क्रिएटिव्ह हेडचा मोठा खुलासा

bigg boss marathi 6 new season : बिग बॉस मराठी ६ च्या थीमबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकरांनी नव्या सीझनमधील मोठ्या ट्विस्टचा इशारा दिला आहे.
bigg boss marathi 6 new season

bigg boss marathi 6 new season : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित आणि प्रेक्षकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi 6 आता अवघ्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शोचा पहिला प्रोमो समोर येताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. विशेषतः पहिल्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांमुळे यंदाची थीम ‘स्वर्ग-नरक’ असणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चांना शोच्या क्रिएटिव्ह हेडनेच स्पष्ट उत्तर दिलं आहे.

Bigg Boss Marathi 6 चे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी नुकतीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शोच्या थीमबाबत मोठा खुलासा केला. स्वर्ग-नरक ही यंदाची संकल्पना असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट नकार दिला. त्यांच्या मते, प्रेक्षकांनी टीझरमध्ये पाहिलेलं दार हे फक्त एका मोठ्या कल्पनेचं छोटंसं संकेत आहे.

केतन माणगावकर म्हणाले की, यंदा बिग बॉसच्या घरात एक-दोन नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. प्रत्येक दरवाजामागे काहीतरी वेगळं, अनपेक्षित आणि खेळाचं गणित बदलणारं सरप्राइज दडलं असेल. रितेश देशमुख यांच्या प्रोमोमधील “दार उघडणार आणि गेम पालटणार” हा संवाद याच कल्पनेचा भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यंदाचा Bigg Boss Marathi 6 हा फक्त भांडणं किंवा रणनीतीपुरता मर्यादित न राहता, सतत बदलणाऱ्या ट्विस्ट्समुळे प्रेक्षकांना अक्षरशः गुंतवून ठेवणारा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सीझनमध्ये नेमके किती दरवाजे असतील, त्या दरवाजांमागे काय असेल, याबद्दल मात्र त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. पुढील प्रोमोमध्ये याची झलक पाहायला मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. “हा सीझन तुम्हाला वेड लावेल,” असं म्हणत त्यांनी अपेक्षा आणखी वाढवल्या आहेत.

दरम्यान, Bigg Boss Marathi 6 ११ जानेवारीपासून रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. हा शो प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर तसेच जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे. यंदाही रितेश देशमुख शोचं सूत्रसंचालन करणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे शोला वेगळीच ऊर्जा मिळणार आहे.

हे पण वाचा.. आरोग्याकडे दुर्लक्ष झालं; ‘तारिणी’ फेम शिवानी सोनारचा नवीन वर्षासाठी नवा संकल्प, २०२५ का ठरलं खास?

इन्फ्लुएन्सर्स शोमध्ये सहभागी होणार का, याबाबत विचारलं असता केतन माणगावकर यांनी याचं उत्तर थेट शो सुरू झाल्यावरच मिळेल, असं सांगितलं. त्यामुळे यंदा कोणते सेलिब्रिटी आणि कोणते नवे चेहरे घरात दिसणार, याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. एकंदरीत, Bigg Boss Marathi 6 हा नेहमीपेक्षा वेगळा, अधिक थरारक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरणार, हे नक्की.

हे पण वाचा.. हातावर मेहेंदी, हिरवा चुडा आणि मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकर च्या व्हायरल फोटोमुळे लग्नाच्या चर्चा रंगात

bigg boss marathi 6 new season