bigg boss marathi 6 dipali Sayed radha Patil lavani vad : बिग बॉस मराठी ६ चा सहावा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अवघ्या दोन दिवसांतच घरातील वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यातील वादामुळे चर्चेला उधाण आलं होतं. आता दुसऱ्या दिवशी घरात पुन्हा एकदा जोरदार वाद रंगला असून यावेळी विषय ठरला आहे .
या सीझनमधील स्पर्धक दिपाली सय्यद या एक अनुभवी नृत्यांगना म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या लावणीने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर विविध नृत्यस्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही त्यांनी आपली ठाम ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे, राधा पाटील हीदेखील लावणीसाठी ओळखली जाते, मात्र तिच्या नृत्यशैलीवरून तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागलेला आहे. सोशल मीडियावर राधा पाटील आणि गौतमी पाटील यांच्यातील तुलना, त्यावरून होणारे वाद आणि प्रतिक्रिया हे काही नवीन नाही.
हाच विषय Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुढे आला आणि त्यातून दिपाली व राधा यांच्यात मतभेद निर्माण झाले. बिग बॉसने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये दिपाली डायनिंग एरियात इतर स्पर्धकांशी लावणीबाबत चर्चा करताना दिसते. लावणीचा सन्मान जपला गेला पाहिजे, असं सांगताना ती काही उदाहरणं देते. मात्र तिच्या बोलण्याचा अर्थ राधाला टोचणारा वाटतो.
दिपालीच्या या वक्तव्यामुळे राधा गार्डन एरियामध्ये येते आणि भावनिक होत आपली बाजू मांडते. “मीही माझी लायकी दाखवू शकते,” अशा शब्दांत ती दिपालीच्या मताला अप्रत्यक्षपणे आव्हान देते. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि नाराजी स्पष्टपणे दिसून येते. प्रोमोमध्ये “दिपालीच्या बोलण्याने राधाचं मन दुखावलं” असं कॅप्शन देत हा क्षण दाखवण्यात आला आहे.
आता या दोन लावणी कलाकारांमधील हा वाद पुढे कोणतं वळण घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. राधा थेट दिपालीला उत्तर देणार का, की हा विषय आणखी गंभीर होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. Bigg Boss Marathi 6 च्या आजच्या भागात या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे पाहायला मिळणार आहेत.
हे पण वाचा.. रोजगारासाठी हमाली, स्वप्नांसाठी बिग बॉस; रोशनची कथा डोळे पाणावणारी
दरम्यान, Bigg Boss Marathi 6 हा नवा सीझन दररोज रात्री आठ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओहॉटस्टारवर प्रेक्षक पाहू शकतात. घरात वाढत चाललेले वाद, भावना आणि संघर्ष यामुळे हा सीझन अधिकच चर्चेत येताना दिसतो आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : ‘मिशन राशन’ टास्कमध्ये गोंधळ, दिव्या शिंदे बेशुद्ध; प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची धाकधूक







