ADVERTISEMENT

बिग बॉस मराठी ६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री; अभिनय, राजकारण आणि संघर्षाचा प्रवास असलेल्या दीपाली सय्यद कोण आहेत?

bigg boss marathi 6 deepali sayed introduction journey : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्याच भागात घरात प्रवेश करणाऱ्या दीपाली सय्यद यांच्या आयुष्याचा प्रवास अभिनयापासून राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे. जाणून घ्या त्यांच्या करिअर, वैयक्तिक आयुष्य आणि संघर्षाविषयी सविस्तर माहिती.
bigg boss marathi 6 deepali sayed introduction journey

bigg boss marathi 6 deepali sayed introduction journey : बिग बॉस मराठी ६ च नव पर्व जल्लोषात सुरू झाल असून, पहिल्याच दिवशी घरात एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही स्पर्धक म्हणजे Deepali Sayed. अभिनय, सामाजिक भूमिका आणि राजकारण असा वेगळा प्रवास करणाऱ्या दिपाली सय्यद आता थेट बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

Deepali Sayed यांचा जन्म मुंबईतील कुर्ला परिसरात झाला. त्यांचं बालपण पूर्णपणे मुंबईतच गेलं. शिक्षणाच्या बाबतीत त्या नेहमीच पुढे होत्या. त्यांनी नालंदा विद्यापीठातून फाइन आर्ट्समध्ये पदवी घेतली. सुरुवातीला कला आणि शिक्षणाकडे झुकलेली वाट असली, तरी पुढे अभिनयाची ओढ त्यांना मनोरंजन विश्वाकडे घेऊन आली.

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात Deepali Sayed यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. ‘बंदिनी’ आणि ‘समांतर’ या मालिकांमधून त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपट, टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये काम केलं. मात्र, २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘जत्रा’ चित्रपटातील ‘ये गो ये मैना’ या गाण्यामुळे त्या घराघरात पोहोचल्या. या गाण्याने Deepali Sayed यांना राज्यभरात वेगळी ओळख मिळवून दिली.

अभिनयात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी राजकारणातही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी २०१४ साली अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली, मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला आणि पुढे २०१९ मध्ये शिवसेनेत सामील झाल्या. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण त्या पराभूत झाल्या. सध्या Deepali Sayed या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत सक्रिय आहेत.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, दिपाली भोसलेंनी १९९८ मध्ये जहांगीर सय्यद यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला आणि त्यानंतर त्या Deepali Sayed म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांना एक मुलगा असून तो सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. “लग्नानंतर मुलीचं आडनाव बदलतं, तसंच माझं बदललं,” असं त्यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितलं आहे.

हे पण वाचा.. माहीविजच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण; घटस्फोटानंतर खास मित्रासाठी लिहिलेल्या शब्दांनी वेधलं लक्ष

आता Bigg Boss Marathi 6 च्या माध्यमातून Deepali Sayed पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून, त्यांच्या स्पष्ट मतांमुळे आणि अनुभवामुळे त्या घरात काय रंगत आणणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा.. ठरलं तर मग मालिकेमध्ये जंगलात थरारक संघर्ष, अर्जुनच्या धैर्यामुळे महिपत शिखेर अखेर पोलिसांच्या ताब्यात

bigg boss marathi 6 deepali sayed introduction journey