ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi 6 : अनुश्री–राकेश वादाचा स्फोट, राकेश म्हणाला ‘मला घरात थांबायचं नाही’

bigg boss marathi 6 anushree rakesh vad : बिग बॉस मराठी ६ च्या दुसऱ्या आठवड्यात घरातील वातावरण तापलं असून अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यातील तीव्र वादामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
bigg boss marathi 6 anushree rakesh vad

bigg boss marathi 6 anushree rakesh vad : बिग बॉस मराठी ६ सुरू होऊन अवघा आठवडा पूर्ण झाला असतानाच घरातील वातावरण पुन्हा एकदा तापलेलं पाहायला मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात घरात झालेल्या गोंधळावर ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने सदस्यांची कानउघाडणी केली होती. काही स्पर्धकांना स्पष्ट शब्दांत सुनावलं, तर काहींना खेळ अधिक चांगला करण्यासाठी सल्लेही दिले. मात्र, दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच घरात शांतता टिकेल, अशी अपेक्षा असताना उलट नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

यावेळी हा वाद अनुश्री माने आणि अभिनेता राकेश बापट यांच्यात झाल्याचं दिसत आहे. नेहमी शांत, संयमी आणि ‘चिल’ स्वभावाचा राकेश या प्रोमोमध्ये मात्र पूर्णपणे वेगळ्याच रूपात पाहायला मिळतो. एका साध्या बेडच्या मुद्द्यावरून सुरू झालेला संवाद काही क्षणांतच गंभीर वळण घेतो. अनुश्री स्पष्ट शब्दांत तिची भूमिका मांडताना राकेशवर आरोप करते की, तिला तिच्या जागेवरून जबरदस्तीने उठवण्यात आलं.

अनुश्रीचे हे शब्द ऐकताच राकेशचा संयम सुटतो. तो संतापलेल्या सुरात तिच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करतो आणि अशा भाषेत बोलणं चुकीचं असल्याचं ठामपणे सांगतो. आपल्या दीर्घ कारकिर्दीचा उल्लेख करत, “मी इतकी वर्ष मेहनत करून इथे आलो आहे, अशा शब्दांत कोणी माझ्याशी बोलणं योग्य नाही,” असं म्हणत तो भावनिक होतो. हा क्षण Bigg Boss Marathi 6 च्या आतापर्यंतच्या सर्वात तणावपूर्ण प्रसंगांपैकी एक ठरतो.

वाद इतका वाढतो की राकेश घरात थांबण्यासही नकार देतो. “मला आता या घरात राहायचं नाही,” असं म्हणत तो घर सोडण्याची इच्छा व्यक्त करतो. याच पार्श्वभूमीवर बिग बॉसकडून घराचं दार उघडल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे राकेश खरंच घराबाहेर जाणार का, की हा राग क्षणिक आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पहिल्या आठवड्यात एकही स्पर्धक एलिमिनेट न झाल्यामुळे दुसऱ्या आठवड्यातील नॉमिनेशन अधिकच महत्त्वाचं ठरणार आहे. करण सोनावणे, अनुश्री माने, दिपाली सय्यद, दिव्या शिंदे, प्रभू शेळके, रोशन भजनकर, रुचिता जामदार, राधा पाटील आणि सागर कारंडे या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 मध्ये नवा धमाका, ‘उल्टा पुल्टा’ खोलीतून बदलणार संपूर्ण गेम

एकूणच Bigg Boss Marathi 6 मध्ये वाढत चाललेले वाद, भावनिक उद्रेक आणि अनपेक्षित निर्णय यामुळे येणारे भाग अधिकच रोचक ठरणार, हे नक्की. प्रेक्षकांसाठी आता खरा प्रश्न एकच आहे, हा वाद मिटणार की घरात आणखी मोठा स्फोट होणार?

हे पण वाचा.. लागिरं झालं जी’मधील शितली आजही प्रेक्षकांच्या लक्षात, जाणून घ्या शिवानी बावकर बद्दल

bigg boss marathi 6 anushree rakesh vad