bigg boss 19 maltine tanyala radavla : लोकप्रिय रियालिटी शो Bigg Boss 19 मध्ये दररोज नवनवीन वळणं पाहायला मिळत आहेत. घरात नुकतीच एन्ट्री घेतलेल्या मालती चहरने केवळ काही दिवसांतच चर्चेत आपली ठसठशीत ओळख निर्माण केली आहे. तिच्या थेट बोलण्याच्या आणि रोखठोक वागण्याच्या शैलीमुळे घरातील वातावरण अधिक तापलेलं दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान मालती आणि तान्या मित्तल यांच्यात झालेला वाद प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हा टास्क म्हणजे घरातल्या कॅप्टन्सीचं महत्वाचं पाऊल होतं. दोघींनाही एका मोठ्या बुटात पाय ठेवून ‘पझल झोन’मध्ये जाऊन एक डिझाईन तयार करायचं होतं. सुरुवातीलाच मालतीनं तान्याला चिडवत म्हणाली, “आधीच सांगते, तू काहीच करणार नाहीस.” यावर तान्याने हसत उत्तर दिलं, “हो गं… मी तसंही काही करत नाही.” या क्षणाला शोमधला आणखी एक स्पर्धक प्रणीत मोरेने तान्याला प्रोत्साहन दिलं आणि ‘Go For It’ असं म्हणत तिला पुढे जाण्यास सांगितलं.
पण पुढच्या काही क्षणांत परिस्थिती नाट्यमय वळण घेते. मालती तान्याशी बोलताना म्हणते, “गेम बदल, नाहीतर तुझ्या घरच्यांना वाईट वाटेल.” याच वाक्यावरून तान्या हादरली. कुटुंबीयांबद्दल बोलणं तिला चांगलं न वाटल्यामुळे ती भावनिक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. काही क्षणांतच तिनं टास्कमधून माघार घेतली आणि मालतीला म्हणाली, “जा, तूच जिंकली आहेस.”
यानंतर तान्या जोरात रडू लागली. ती झीशान कादरीशी बोलताना म्हणाली, “मी अजून स्ट्रॉंग होऊ शकत नाहीये… मला खूप वाईट वाटतंय.” झीशान तिला समजावत म्हणाला, “मालती खूप स्मार्ट पद्धतीने खेळतेय. तिनं मला सुद्धा सांगितलं होतं की, तू स्ट्रॉंग प्लेयर आहेस.”
या सगळ्या घटनेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला असून घरातल्या सदस्यांमधल्या नात्यांवर त्याचा परिणाम होणार हे निश्चित आहे. मालतीनं नेमकं कुटुंबाबद्दल काय वक्तव्य केलं होतं, हे आगामी भागात स्पष्ट होईल. तसंच, या प्रसंगानंतर तान्या पुन्हा सावरते का आणि पुढच्या टास्कमध्ये ती किती खंबीरपणे खेळते हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. Bigg Boss 19 मालती चहर आणि मृदुल तिवारी मध्ये वाद पेटला दोघांमध्ये तुफान शाब्दिक झटापट! प्रोमो पहिलात का?
Bigg Boss 19 मध्ये अशा छोट्या गोष्टी मोठ्या वादाला तोंड फोडतात, हे नवीन नाही. पण या वेळी मालती आणि तान्याच्या वादामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पुढचा भाग अधिक नाट्यमय असेल असं स्पष्ट दिसतंय. शोच्या चाहत्यांनी आता या वादाचं पुढचं पान पाहण्यासाठी आपली नजर टीव्हीसमोर खिळवली आहे.
हे पण वाचा.. ९ वर्षांनी प्रेमात पडला ‘उतरन’ फेम नंदिश संधू; अभिनेत्री कविता बॅनर्जीशी गुपचूप साखरपुडा, अमृता खानविलकरची खास कमेंट!







