ADVERTISEMENT

Bigg Boss 19 मालती चहर आणि मृदुल तिवारी मध्ये वाद पेटला दोघांमध्ये तुफान शाब्दिक झटापट!  प्रोमो पहिलात का?

bigg boss 19 malti chahar aani mrudul tiwari vaad : ‘बिग बॉस १९’मध्ये या आठवड्यात वाइल्ड कार्डद्वारे आलेली मालती चहर आणि शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा मृदुल तिवारी यांच्यात जोरदार वाद झाल्याने प्रेक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
bigg boss 19 malti chahar aani mrudul tiwari vaad

bigg boss 19 malti chahar aani mrudul tiwari vaad : रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’मध्ये या आठवड्याची सुरुवातच धमाकेदार झाली आहे. घरात नव्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाच्या एन्ट्रीनं वातावरण चांगलंच तापवलं आहे. क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहरने या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल ठेवताच तिचा दमदार अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिल्याच टास्कमध्ये तिनं तानिया मित्तलला कडवा सामना दिला आणि त्यामुळे घरात चर्चांचा धुराळा उडाला.

मालतीनं टास्कदरम्यान तानियाला थेट स्विमिंग पूलमध्ये ढकलल्याचा व्हिडीओ प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही चांगलाच गाजला. तानिया रडत असतानाही मालतीनं आपली भूमिका बदलली नाही. उलट तानियाचं ‘खरं रूप’ सर्वांसमोर आणल्याचा दावा करत तिनं घरात नवा रंग भरला.

तानियासोबतचा वाद अजून ओसरलेलाच नसताना आता मालती आणि मृदुल तिवारी यांच्यात देखील भांडण पेटल्याचं समोर आलं आहे. शांत स्वभावामुळे आतापर्यंत प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत न आलेला मृदुल यावेळी मात्र पूर्णपणे वेगळ्या मूडमध्ये दिसला. गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये Salman Khan याने त्याला अधिक आक्रमक खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला मृदुलनं मनावर घेतल्याचं स्पष्टपणे जाणवतं आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये मालती चहर आणि मृदुल तिवारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. मृदुल शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करत असताना मालती त्याला मध्येच थांबवत, “पागल आहेस काय?” असं म्हणते. एवढ्यावर मृदुलचा संयम सुटतो आणि तोही तिला तिखट शब्दांत उत्तर देतो. “इतकी वाईट शिवी देऊ की तुला लाज वाटेल,” असं म्हणत त्याने मालतीवर जोरदार प्रहार केला.

वाद चिघळत जातो आणि दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागतात. मालती “चल हट” म्हणत तिथून उठते, तर मृदुलही मागे हटत नाही. तोही प्रत्युत्तर देत म्हणतो, “तुला एका मिनिटात भूत बनवीन.” त्यावर मालती पुन्हा त्याला पागल म्हणते, आणि मृदुलही चिडून उत्तर देतो, “हो, आहे मी पागल. तुझ्यासारखे पन्नास पागल एका मिनिटात फेकून देईन.”

या भांडणाचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही; मात्र घरातील टास्कदरम्यान तणाव वाढल्यामुळेच ही चकमक झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आजच्या भागात या घटनेचा संपूर्ण किस्सा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हे पण वाचा.. कंटेनर थोडासा वेगात आला असता तर.. रुपाली भोसलेने सांगितला भीषण अपघाताचा अनुभव Rupali Bhosle Accident

सोशल मीडियावर या प्रोमोने प्रचंड चर्चेला उधाण आलं आहे. अनेक प्रेक्षकांनी मृदुलचा आक्रमक अवतार पाहून आश्चर्य व्यक्त केलं असून काहींनी त्याच्या नव्या अंदाजाचं कौतुकही केलं आहे. ‘Bigg Boss 19 Malti Chahar And Mridul Tiwari’ या वादामुळे या आठवड्यातील एपिसोडला नक्कीच अधिक रंग चढणार, हे स्पष्ट झालं आहे.

हे पण वाचा.. मराठी गायिका आनंदी जोशीला डॉक्टरकडून अश्लील मेसेज; सोशल मीडियावर शेअर केला धक्कादायक अनुभव

bigg boss 19 malti chahar aani mrudul tiwari vaad