ADVERTISEMENT

तुमची मुलगी जिवंत आहे…” – कमळी मालिकेत कमळी करणार मोठा खुलासा, कामिनीचा डाव उलटणार?

big twist in the Kamali serial Kamali reveals the truth : झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेत प्रचंड भावनिक आणि धक्कादायक वळण येणार आहे. नव्या प्रोमोमध्ये कमळी राजनसमोर मोठं सत्य उघड करणार असल्याचं पाहायला मिळतं.
big twist in the Kamali serial Kamali reveals the truth

big twist in the Kamali serial Kamali reveals the truth : झी मराठी वाहिनीवरील Kamali ही मालिका सध्या जबरदस्त ट्विस्टमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. कमळी, अन्नपूर्णा आजी, राजन आणि गौरी उर्फ सरोज यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कथानक अधिकच गुंतागुंतीचं झालं आहे. विशेषतः कामिनीच्या कारस्थानांनी मालिकेचा वेग आणि तणाव दोन्ही वाढवले आहेत.

मालिकेत दाखवल्याप्रमाणे, कामिनी ही स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारी व्यक्तिरेखा आहे. तिच्यासोबत मुलगी रागिणी आणि नात अनिका देखील प्रत्येक कटात सामील असतात. राजनशी रागिणीचं लग्न व्हावं, यासाठी कामिनीने अनेक घाणेरडे डाव आखले. राजन परदेशात असताना त्याची पत्नी गौरी आणि त्यांच्या लहान मुलीला संपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्या संकटातून वाचण्यासाठी गौरीने आपली ओळख बदलली आणि सरोज या नावाने दुसऱ्या गावात राहायला सुरुवात केली. याच काळात कमळीला स्वतःच्या वडिलांबद्दल काहीच माहिती नसते.

आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कमळी गावातून मुंबईत येते. या प्रवासात ती नकळतपणे राजन, अन्नपूर्णा आजी आणि कामिनीच्या कुटुंबाच्या संपर्कात येते. पण ज्या नातीचा शोध अन्नपूर्णा आणि राजन वर्षानुवर्षे घेत होते, तीच कमळी आहे, हे कोणालाही उमगत नाही. दुसरीकडे, कामिनीही गौरी आणि तिच्या मुलीचा शोध घेत असते. अखेर तिला गौरी सापडते आणि इथेच कथानकाला भीषण वळण मिळतं.

कामिनी एका कमळीच्या वयाच्या मुलीचं अपहरण करून मोठं षड्यंत्र रचते. अपघात घडवून आणला जातो, ज्यात त्या निष्पाप मुलीचा मृत्यू होतो, तर सरोज गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होते. आपली नात मरण पावल्याचं जेव्हा अन्नपूर्णा आजीला कळतं, तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून जाते. या दुःखाचा फायदा घेत कामिनी अन्नपूर्णाला प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकते, आणि या धक्क्याने अन्नपूर्णा आजी बेशुद्ध पडते.

Kamali मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मात्र सगळं चित्र बदलताना दिसतं. ज्या मुलीच्या मृत्यूनंतर प्रार्थना सभा सुरू असते, तिथे अचानक कमळी येते आणि राजनसमोर खळबळजनक सत्य मांडते. “तुमची मुलगी जिवंत आहे… या फोटोमधली मुलगी तुमची नाही,” असं ती ठामपणे सांगते. हे ऐकताच राजन हादरून जातो.

हे पण वाचा.. शुभविवाह मधील पौर्णिमाच्या घरी आनंदाचं पर्व – कुंजिका काळविंटच्या लेकाचं बारसं उत्साहात पार

झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये ‘कामिनीचा डाव कमळी उधळून लावणार’ अशी कॅप्शन दिली असून, पुढील भागांमध्ये कमळीचं सत्य सगळ्यांसमोर येणार का, अन्नपूर्णाला तिची खरी नात ओळखता येणार का, आणि कामिनी आता पुढे कोणता डाव खेळणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी फारच रंजक ठरणार आहे. Kamali मालिकेतील हे वळण प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवी उंची देणार, यात शंका नाही.

हे पण वाचा.. अंशुमनचा खरा चेहरा उघड! वीण दोघांतली ही तुटेना मध्ये स्वानंदीमुळे राजवाडे घरात सत्तापालटाची ठिणगी

big twist in the Kamali serial Kamali reveals the truth